

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी शरद पवार गटात धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज (दि.१४) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते-पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. Daharisheel Mohite Patil join NCP
माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी अकलूजचे मोहिते-पाटील आणि फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, भाजप श्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा मोठा आग्रह कार्यकर्ते भाजपमध्ये असलेल्या मोहिते-पाटील यांना करत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा