चंद्रपूर : बल्लारपूर येथून तेलंगणात रेल्वेने गांजाची तस्करी; तिघांना अटक | पुढारी

चंद्रपूर : बल्लारपूर येथून तेलंगणात रेल्वेने गांजाची तस्करी; तिघांना अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बल्लारपूर येथून तेलंगणात रेल्वेने गांजाची तस्करी करताना बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास तिघांना अटक केली. राजेश नायक बाबुराव घुगलोत (वय२९, रा. रामगुंडम जि. करिमनगर) मशी अवनीधर गाजुला (वय २२, रा. हॉयटेक सिटी रोड जि. मंचेरियल, तेलंगाणा) अरबाज शफी खान (वय २३, रा. तिलक वार्ड बल्लारपूर ) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ९३९ ग्रॅमचा गांजा व गांजाची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बँग्स असा एकूण ९४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपुरात आचार संहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचाऱ्यांकडून शनिवारी (दि.१३) रात्री बल्लारपूर येथील एस.एस.टी. पाईंटजवळ वाहनांची झडती घेण्यात आली. यावेळी तिघे संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात पोलिसांकडून झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्याकडे ९३९ ग्रॅमचा गांजा मिळून आला. त्यांची अधिक चौकशी केली असता हा गांजा बल्लारपूर येथून रेल्वेने तेलंगणात घेऊन जात असल्याची माहिती संशयितांनी दिली.ही कारवाई पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, गजानन डोहीफोडे, रणविजय ठाकुर, आंनद परचाके, बाबा नैताम, संतोष दंडेवार, शेखर माथनकर, लखन चव्हाण यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button