IPL 2024 Rishabh Pant | पंत दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज, त्याच्या नावावर आहे ‘हा’ खास रेकॉर्ड

IPL 2024 Rishabh Pant | पंत दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज, त्याच्या नावावर आहे ‘हा’ खास रेकॉर्ड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसऱ्या सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. पुनरागमन करताना पंत दिल्लीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंत दीर्घकाळापासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. दिल्लीकडून खेळताना त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे आणि त्याने या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने भारताचा आणि दिल्लीचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवागला मागे टाकले आहे. (IPL 2024 Rishabh Pant)

'या' बाबतीत पंत सेहवाग- वॉर्नरच्या पुढे

दिल्ली कॅपिटल्सकडून संघात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग खेळला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या संघात आहे. दिल्लीकडून खेळताना त्यांनी बरेच यशही मिळवले आहे. पण पंत या सर्व दिग्गजांपेक्षा पुढे आहे. दिल्लीसाठी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये पंतचाही समावेश होतो. या फ्रँचायझीसाठी त्याने आतापर्यंत 97 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 2838 धावा केल्या आहेत. या फ्रँचायझीसाठी पंतपेक्षा इतर कोणत्याही फलंदाजाने जास्त धावा केल्या नाहीत. पंतनंतर माजी कर्णधार वॉर्नरचा क्रमांक येतो. वॉर्नरने दिल्लीसाठी 82 सामने खेळले असून त्याने एकूण 2404 धावा केल्या आहेत, तर वीरेंद्र सेहवाग 2382 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (IPL 2024 Rishabh Pan)

तब्बल 15 महिन्यांनंतर क्रिकेट मैदानावर पुनरागमन

30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून घरी जात असताना झालेल्या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर त्याला प्रथम डेहराडून येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) देखरेखीखाली त्याला एअरलिफ्ट करून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंत यांच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. दुखापत बरी झाल्यानंतर पंतचे बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे पुनर्वसन करण्यात आले. यादरम्यान त्याने हळूहळू क्रिकेटचा सराव सुरू केला.

पंतच्या अनुपस्थितीत वॉर्नरकडे संघाची धुरा

गंभीर दुखापतीमुळे पंत गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्स संघाची कमान सांभाळली. आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी, फ्रँचायझीने पुन्हा एकदा दिल्लीची कमान पंतकडे सोपवली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news