IPL Opening Ceremony : आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूडचे तारे लावणार ‘चारचाँद’ | पुढारी

IPL Opening Ceremony : आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूडचे तारे लावणार 'चारचाँद'

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट चाहते दरवर्षी आयपीएलच्या थराराची वाट पाहत असतात. यंदाच्या आयपीएल हंगाम सुरू होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. या हंगातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर खेळव्यात येणार आहे. रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त आयपीएल उद्घाटन समारंभासाठीदेखील प्रसिद्ध आहे, या सोहळ्यासाठी जगभरातील स्टार्स आपल्या कलाविष्काराने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असतात. यावेळीही आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांसारखे बॉलिवूड कलाकार थिरकताना दिसणार आहेत. (IPL Opening Ceremony)

सामन्याला अर्धा तास विलंब

आयपीएलचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. सहसा, आयपीएल सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतात, परंतु उद्घाटन समारंभ सामन्यापूर्वी आयोजित केल्यामुळे RCB आणि CSK यांच्यातील सामना अर्ध्या तासाच्या विलंबाने सुरू होणार. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. (IPL Opening Ceremony)

सायंकाळी साडेसहा वाजता होणार सोहळा

आजपासून आयपीएलच्या 17व्या हंगामाची सुरुवात आहे. यासाठी आयोजकांनी बरीच तयारी केली असून त्यात अनेक बॉलीवूड कलाकार आणि गायक आपल्या परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मंत्रमुग्ध करणार आहेत. सामन्यापूर्वीचा हा रंगतदार कार्यक्रम सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.

बॉलिवूड स्टार सजवणार आयपीएलची संध्याकाळ

या सेरेमनीला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारख्या स्टार्सची उपस्थिती आणि त्यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करण्यासाठी ए. आर. रहमान आणि सोनू निगम ही या सेरेमनीसाठी चेन्नईमध्ये असतील. या परफॉर्मन्सव्यतिरिक्त यापूर्वी कधीही न पाहिलेले एआर (ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी) चे प्रदर्शनदेखील असेल जे ओपनिंग सेरेमनीचे खास वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा :

Back to top button