

कोलंबो; वृत्तसंस्था : भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याच्या अपघाताची पुनरावृत्ती श्रीलंकेत घडली. श्रीलंकेचा स्टार क्रिकेटर लाहिरू थिरिमाने याला गुरुवारी अनुराधापुरा येथील थ्रीपेन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Lahiru Thirimanne)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थिरिमानेला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी 7.45 च्या सुमारास थिरिमानेची कार विरुद्ध दिशेने येणार्या एका लॉरीला धडकल्याने हा अपघात झाला. अडा डेराना यांनी दिलेल्या वृत्तानुसार लॉरीच्या समोरासमोर धडक झाल्यानंतर कारने पेट घेतली. या अपघातात ट्रक चालकासह कारमधील अन्य तीन जण जखमी झाले असून, त्यांना उपचार मिळाले आहेत. (Lahiru Thirimanne)
21 वर्षीय थिरिमाने याने 2010 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले आणि पुढील काही वर्ष तो श्रीलंकेच्या संघाचा नियमित सदस्य होता; पण प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला प्रत्येकवेळी संधी मिळाली नाही. तिलकरत्ने दिलशानच्या निवृत्तीनंतर थिरिमानेला संधी मिळाली. त्याने अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत संघाचे काही सामन्यांत नेतृत्वही संभाळले. 2022 मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. त्याने 44 कसोटींत 3 शतके व 10 अर्धशतकांसह 2,088 धावा, 127 वन-डेत 3,194 धावा केल्या.
हेही वाचा :