देशभरात पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी स्वस्त; निवडणुकीपूर्वी केंद्राकडून मोठा दिलासा | पुढारी

देशभरात पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी स्वस्त; निवडणुकीपूर्वी केंद्राकडून मोठा दिलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. निवडणुकीच्या वर्षात मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. याआधी राजस्थान सरकारनेही आपल्या पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. आता संपूर्ण देशाला भेट देण्याचे काम केंद्राने केले आहे. उद्या शुक्रवारी (दि. १५) सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू होतील.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट केले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ₹ 2 ने कमी करून, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीच ध्येय आहे.

Back to top button