shreyas iyer : ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ श्रेयसवर कौतुकाचा वर्षाव | पुढारी

shreyas iyer : ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ श्रेयसवर कौतुकाचा वर्षाव

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारत आणि न्युझीलंड यांच्यात कानपूर येथे कसोटी सामना सुरू आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात श्रेयश अय्यरने शतक झळकावल्याने चाहत्यांनी श्रेयशचे भरभरून कौतुक केले. त्याने १०५ धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीने चाहत्यांनी अक्षरश: वेड लावले. प्रेक्षकांनी मैदानात ‘दस रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’ अशा घोषणा देत त्याचे कौतुक केले. (shreyas iyer)

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नेटकरी या व्हिडीओवर अतीशय भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा अय्यर हा १६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

याचबरोबर कसोटीमध्ये पदार्पण करत शतक ठोकणारा तो सलग तिसरा मुंबईकर ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली आहे.

shreyas iyer : कसोटीमध्ये पदार्पणात शतक ठोकणारा अय्यर तिसरा मुंबईकर

भारताचा नवा टी-२० कप्तान रोहित शर्माने २०१३ मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात कसोटी शतक ठोकले. यावेळी त्याने १७७ धावांची खेळी केली. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये १३४ धावांची खेळी केली. आता श्रेयसने शतक केल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.

श्रेयसनं १५७ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे श्रेयस कसोटी पदार्पणात शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी पृथ्वी शॉने अशी कामगिरी केली होती.

तसेच ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच भारताला कसोटी पदार्पणात शतकवीर मिळाला आहे.

श्रेयसच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे.

एक आठ वर्षाचा मुलगा, भारतीय जिमखाना संघाच्या वतीने तो हातात बॅट घेऊन मैदानात उतरतो. त्याच्या बॅटने तो इतिहास घडवतो. ४६ चेंडूत शतक मारतो.

श्रेयस अय्यरला क्रिकेटमध्ये चमकला तो फक्त प्रविण अमरे यांच्यामुळेच

सगळ्या मुलांच्या स्वप्नांसारख त्याचही स्वप्न भारतीय क्रिकेट संघात खेळण्याच असतं.

तो हा इतिहास रचत असताना षटकार आणि चौकारांची बरसात करतो.

सगळ्या मैदानात त्याची वाहवा होते. तो आठ वर्षाचा मुलगा म्हणजे श्रेयस अय्यर.

श्रेयस अय्यरच्या या यशाने घरी आनंदी होतात.

या यशामुळे श्रेयसला घेऊन त्याचे वडील संतोष अय्यर त्याला शिवाजी पार्क येथील जिमखान्यात घेऊन जातात.

पण त्याला तो फक्त ११ वर्षाचा असल्याच सांगून परत पाठवण्यात येते.

यानंतर श्रेयसचे वडिल त्याला वरळी स्पोर्टसं क्लबमध्ये पाठवतात.

एक तिकडे प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर श्रेयस अय्यरने शिवाजी पार्कातील जिमखान्यात प्रवेश घेतला.

शिवाजी पार्कमध्ये त्याची आणि प्रवीण अमरे यांची भेट होते.

श्रेयस अय्यरला क्रिकेटमध्ये चमकला तो फक्त प्रविण अमरे यांच्यामुळेच.

त्यांनी भारतीय क्रिकेटला अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा यांच्यासारखे खेळाडू दिलेत.

हे ही वाचलं का? 

Back to top button