Shreyas Iyer : कसोटी पदार्पणातच शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू | पुढारी

Shreyas Iyer : कसोटी पदार्पणातच शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू

कानपूर : पुढारी ऑनलाईन

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताने गाजवला. आज शुक्रवारी सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताला पाचवा धक्क बसला. रवींद्र जडेजा अर्धशतक करुन बाद झाला. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टीम इंडियासाठी कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं. श्रेयसनं १५७ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे श्रेयस कसोटी पदार्पणात शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी पृथ्वी शॉने अशी कामगिरी केली होती. तसेच ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच भारताला कसोटी पदार्पणात शतकवीर मिळाला आहे.

खेळाच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) (नाबाद 75) टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करीत पहिल्याच डावात सुरेख अर्धशतक झळकावले होते. श्रेयसने रवींद्र जडेजाच्या साथीने नाबाद शतकी भागीदारी करून टीम इंडियाला अडचणीतून मजबूत स्थितीत आणले होते. आज त्याने शतक पूर्ण केले. पण १०५ धावांवर श्रेयस आउट झाला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावण्याची कामगिरी केली आहे.

श्रेयसची धमाकेदार कामगिरी

२०१४ मध्ये यूएईमध्ये वर्ल्ड कप U-19 मध्ये श्रेयसनं तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावत १६१ धावा केल्या होत्या. अंडर-१९ वर्ल्डकप शिवाय श्रेयसनं युके दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने तीन सामन्यांत ९९ च्या सरासरीने २९७ धावा केल्या होत्या. एका सामन्यात तर त्याने १७१ धावांची खेळी केली होती. रणजीसाठी खेळल्यानंतर श्रेयसला दिल्ली डेयरडेविल्सनं २०१५ मध्ये २.६ कोटी रक्कम देऊन खरेदी केले. आपल्या पहिल्या हंगामात त्याने १४ सामने खेळले. त्यात त्याने ४ अर्धशतके झळकावली आणि एकूण ४३९ धावा केल्या. श्रेयसच्या दमदार कामगिरीमुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या टीमला लीड करण्याची त्याला संधी मिळाली होती. त्यावेळी श्रेयस केवळ २३ वर्षाचा होता. कप्तानी पदार्पणातील पहिल्या सामन्यात त्याने ४० चेंडूत ९३ धावांची दमदार खेळी केली. २०१९ आणि २०२० मध्ये त्याने दिल्ली संघाचे नेतृत्व करत टीमला प्लेऑफ पर्यंत पोहोचवले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

Back to top button