IND vs End 3rd Test : मिशन ‘राजकाेट’ फत्ते, तिसर्‍या कसाेटीत भारताचा दिमाखदार विजय | पुढारी

IND vs End 3rd Test : मिशन 'राजकाेट' फत्ते, तिसर्‍या कसाेटीत भारताचा दिमाखदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवशीच टीम इंडियाने इंग्‍लंडला चारीमुंड्या चीत केले. तब्‍बल 434 धावांनी पराभव करत पाच सामन्‍यांच्‍या कसाेटी मालिकेत 2-1 अशी अघाडी घेतली. या सामन्‍यात भारताने आपला दुसरा डाव 430/4 धावांवर घोषित केला. यानंतर इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करताना इंग्‍लंडचा दुसरा डाव 122 धावांवर आटाेपला. भारताने ४34 धावांनी दिमाखदार विजय नाेंदवला. (IND vs End 3rd Test)

सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माचे दमदार शतक जडेजाची ११२ धावांची धडाकेबाज खेळी, दुसऱ्या जैस्वालचे द्वीशतक गिल ९१ धावा सर्फराजचे दोन्ही डावातील अर्धशतकाच्या जोरावर भारताने या सामन्यावर पकड मजबूत केली. पहिल्या डावात सिराजचा भेदक मारा तर, दुसऱ्या डावात जडेजा- कुलदीपच्या फिरकीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा नामुष्कीजनक पराभव केला. (IND vs End 3rd Test)

राजकोटमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवर गारद झाला. मार्क वुड वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 20 चा आकडाही गाठता आला नाही. वुडने 15 चेंडूत 33 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. याशिवाय कुलदीपला दोन बळी मिळाले. बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली, तर विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारताने जिंकली.

राजकोटमध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत 445 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर संपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी होती. भारताने 4 बाद 430 धावा करून दुसरा डाव घोषित केला. एकूण आघाडी 556 धावांची झाली. 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश डाव 122 धावांवर आटोपला. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.

इंग्लंडचा डाव आटोपला

सामन्याच्या 40 व्या षटाकात इंग्लंडच दुसरा आटोपला. भारताचा वेगवान गोलंदाज रवींद्र जडेजाने मार्क वूडला जैस्वाल करवी झेलबाद करत इंग्लंडला 122 धावांवर रोखले.

इंग्लंडला नववा धक्का

इंग्लंडला 91 धावांवर नववा धक्का बसला. अश्विनने टॉम हार्टलीला बोल्ड केले. त्याला 16 धावा करता आल्या. यासह, अश्विनचा डावखुरा कसोटीतील हा 250 वा बळी ठरला. भारत विजयापासून एक पाऊल दूर आहे.

इंग्लंडला आठवा धक्का

इंग्लंडला 82 धावांवर आठवा धक्का बसला. जडेजाने बेन फॉक्सला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. त्याला 16 धावा करता आल्या. सध्या मार्क वुड आणि टॉम हार्टले क्रीजवर आहेत. जडेजाचे हे चौथे यश ठरले.

इंग्‍लंडला सलग तीन धक्‍के

नाईट वॉचमन म्‍हणून आलेल्‍या रेहान अहमद यांना कुलदीप यादवने आपल्‍या फिरकीच्‍या जाळ्यात अडकले. त्‍याने सिराजकडे सोपा झेल दिला. त्‍यालाही खाते उघडता आले नाही. इंग्‍लंड ५० धावांवर सातवी विकेट गमावली आहे. तत्‍पूर्वी राजकोट कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंड पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे. 557 धावांच्या लक्ष्यासमोर संघाने 50 धावांवर ६ गडी गमावले आहेत. कुलदीप यादवने बेन स्टोक्सला यष्‍टीचीत करत इंग्‍लंडला सहावा धक्‍का दिला. तत्‍पूर्वी 557 धावांच्या लक्ष्याचा पाठलागासाठी मैदानात उतरलेल्‍या इंग्‍लंड संघाला रवींद्र जडेजाने दणका दिला. त्‍याने जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि ऑली पोप यांना तंबूत धाडले. जॅक क्रॉलीला जसप्रीत बुमराह LBW. रूटने 7, क्रॉलीने 11, बेन डकेटने 4, बेअरस्टोने 4 आणि पोपने 3 धावा केल्या. डकेट धावबाद झाला. (IND vs End 3rd Test)

२८ धावांवर इंग्लंडला चौथा धक्का

इंग्लंडला २८ च्या स्कोअरवर चौथा धक्का बसला. पोपला बाद केल्यानंतर जडेजाने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेअरस्टोला चार धावा करता आल्या. सध्या जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स क्रीजवर आहेत. १३ षटकापर्यंत इंग्लडची धावसंख्या ४ बाद ३२ धावा आहेत.

इंग्लंडला तिसरा धक्का, ओली पोप झेलबाद

२० धावांवर इंग्लंडला तिसरा धक्का बसला. जडेजाने ओली पोपला स्लिपमध्ये रोहितकरवी झेलबाद केले. त्याला तीन धावा करता आल्या. अश्विनही चहापानानंतर मैदानात परतला. यामुळे टीम इंडियाची गोलंदाजी मजबूत झाली आहे.

चहापानापर्यंत इंग्लंडच्या २ बाद १८ धावा

चौथ्या दिवशी चहापानापर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद १८ धावा आहेत. ५५७ धावांचे इंग्लडला लक्ष्य आहे, डकेट आणि क्रोली पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. इंग्लंडला पहिला धक्का १५ धावांवरच बसला. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे भारताने डकेटला धावबाद केले. डकेटला चार धावा करता आल्या.

यशस्वी जैस्वाल 214 धावा करून नाबाद माघारी परतला आणि सर्फराज खानने 68 धावा केल्या. शुभमन गिल ९१ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात भारताने 445 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने 319 धावा केल्या होत्या. (IND vs End 3rd Test)

जैस्वालचे ‘अभूतपूर्व’ यश

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या यशस्वी जैस्वालने अनोख्या पराक्रम आपल्या नावावर केला. जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. यानंतर त्याने मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही धडाकेबाज द्विशतकी खेळी केली.एकाच कसोटी मालिकेत दोन द्विशतके झळकवण्याच्या पराक्रम त्‍याने केला आहे. या खेळीत त्याने २३१ चेंडूमध्ये १४ चौकार आणि १० षटकार लगावले. या शानदार खेळीसह त्यान सर्फराज खानसोबत पाचव्या विकेटसाठी १४० धावांची भागिदारी केली.

सर्फराजचे ६५ चेंडूत अर्धशतक

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्फराजने ६५ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. (IND vs End 3rd Test)

जैस्वालचे ‘यशस्वी’ दीड शतक

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताच्या यशस्वी जैस्वालने आपले दीड शतक साजरे केले. त्याने १९२ चेंडूत आपले दीड शतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. यासह त्याने सर्फराज खानसोबत पाचव्या विकेटसाठी ६८ चेंडूत ६३ धावांची भागिदारी केली आहे.

चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारत ४ बाद ३१४

चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने चार गडी गमावून 314 धावा केल्या होत्या. सध्या यशस्वी जैस्वाल 149 धावांवर तर सर्फराज 22 धावांवर खेळत आहे. दोघांनीही तुफानी फलंदाजी करत 62 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडियाकडे आतापर्यंत एकूण 440 धावांची आघाडी आहे. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. यावेळी भारताकडे 126 धावांची आघाडी होती. (IND vs SA 3rd Test)

भारताने शनिवारीच रोहित शर्मा (19) आणि रजत पाटीदार (0) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्याचवेळी शुभमन गिलसोबत 155 धावांची भागीदारी केल्यानंतर यशस्वी जैस्वाल पाठदुखीमुळे निवृत्त झाला होता. आज रविवारी भारताला पहिला धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो धावबाद झाला आणि नऊ धावांनी शतक हुकले. गिल ९१ धावा करू शकला. त्याने कुलदीप यादवसोबत ५५ धावांची भागीदारी केली. यानंतर यशस्वी मैदानात आला. कुलदीपने 27 धावांची छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. त्यानंतर यशस्वी आणि सरफराज यांनी एकही विकेट पडू दिली नाही.

हेही वाचा :

Back to top button