Ravindra Jadeja’s Century : रोहित पाठोपाठ जडेजाची बॅट ‘तळपली’, राजकाेट कसाेटीत शतक | पुढारी

Ravindra Jadeja’s Century : रोहित पाठोपाठ जडेजाची बॅट 'तळपली', राजकाेट कसाेटीत शतक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला. त्‍याने 157 चेंडूत ११ चौकार २ षटकार ठोकत स्‍मरणीय शतकी खेळी केली. यानंतर भारताचा अष्‍टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानेही धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करत शतक झळकावले. त्‍याने 198 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार झळकावत शतक पूर्ण केले. त्‍याचे कसोटी कारकीर्दीतील चौथे शतक ठरले आहे. ( India vs England 3rd Test Ravindra Jadejas Century )

Ravindra Jadeja’s Century :  राेहितला भक्‍कम साथ देत साकारली शतकी खेळी

तिसर्‍या कसोटी सामन्‍यात भारताने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अत्‍यंत खराब झाला. भारताला पहिला धक्‍का २२ धावांवर बसला. यशस्‍वी जैस्‍वाल १० धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल शून्‍यवर तर रजित पाटीदार ५ धावांवर बाद झाला. ३३ धावांवर भारताने तीन गडी गमावले हाेते. यानंतर राेहित शर्माला साथ देण्‍यासाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला. त्‍याने इंग्‍लंडचा गाेलंदाजाचे  दडपण झुगारले. कर्णधार राेहित शर्माला भक्‍कम साथ देत आपला नैसर्गिक खेळीला संयमाची जाेड देत टीम इंडियासाठी बहुमूल्‍य शतकी खेळी केली. ( India vs England 3rd Test Ravindra Jadejas Century )

 रोहीत शर्माचे दमदार शतक

इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला. त्‍याने 157 चेंडूत ११ चौकार २ षटकार ठोकत स्‍मरणीय शतकी खेळी केली. त्‍याचे कारकीर्दीतील हे ११ वे कसोटी शतक ठरले आहे. आजची त्‍याची शतकी खेळी भारताच्‍या पहिल्‍या डावाला आकार देणारी ठरली. रोहित शर्मा सात महिन्यानंतर कसोटीत शतकी खेळीचा दुष्काळ संपवला. त्याने आपले अखेरचे शतक वेस्ट इंडिजविरूद्धच्या १२ जुलौला खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात झळकवले होते. यानंतर रोहितला कसोटीमध्ये शतक झळकवता आले नव्हते.

Ravindra Jadeja’s Century : रोहित-जडेजा जोडीची चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी

रोहित-जडेजा जोडीने शिस्तबद्ध फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे ३३-३ बाद असलेला स्कोअर २३३- ३ बाद असा झाला.

कर्णधार रोहित शर्मा १३१ धावांवर बाद

५६ व्‍या षटकामध्‍ये भारताने ३ गडी गमावत २०० धावांचा टप्‍पा पूर्ण केला. शतकी खेळीनंतर कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत धावफलक हालता ठेवला. मात्र ६३ व्‍या षट्‍कात फिरकीपटू मार्क वूडला जोरदार फटका लगावताना स्‍टोक्‍सने त्‍याचा झेल घेतला. रोहितने १९६ चेंडूचा सामना करत १४ चौकार आणि ३ षटकार फटकावत १३१ धावांची खेळी केली.

हेही वाचा : 

 

Back to top button