Rohit Sharma Century : कॅप्टन इनिंग..! राजकोट कसोटीत रोहीत शर्माचे दमदार शतक | पुढारी

Rohit Sharma Century : कॅप्टन इनिंग..! राजकोट कसोटीत रोहीत शर्माचे दमदार शतक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्धच्‍या पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील तिसर्‍या सामन्‍यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला. त्‍याने 157 चेंडूत ११ चौकार २ षटकार ठोकत स्‍मरणीय शतकी खेळी केली. त्‍याचे कारकीर्दीतील हे ११ वे कसोटी शतक ठरले आहे. आजची त्‍याची शतकी खेळी भारताच्‍या पहिल्‍या डावाला आकार देणारी ठरली. ( Rohit Sharma Century )

Rohit Sharma’s Century : राेहित शर्माला अखेर सूर गवसला

तिसर्‍या कसाेटी सामन्‍यात भारताने टाॅस जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अत्‍यंत खराब झाला. भारताला पहिला धक्‍का २२ धावांवर बसला. यशस्‍वी जैस्‍वाल १० धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल शून्‍यवर तर रजित पाटीदार ५ धावांवर बाद झाला. ३३ धावांवर भारताने तीन गडी गमावले हाेते. यानंतर दडपण झुगारत राेहित शर्माने आपला नैसर्गिक खेळीला संयमाची जाेड देत ७२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एकदा सूर गवसल्‍यानंतर त्‍याने इंग्‍लंडच्‍या गाेलंदाजांचा समाचार घेत आपलं  शतकही पूर्ण  केले. त्‍याची ही खेळी टीम इंडियाचा आत्‍मविश्‍वास वाढविणारी ठरली. (Rohit Sharma Century )

सात महिन्यानंतर राेहितने झळकावले शतक

रोहित शर्मा सात महिन्यानंतर कसोटीत शतकी खेळीचा दुष्काळ संपवला. त्याने आपले अखेरचे शतक वेस्ट इंडिजविरूद्धच्या १२ जुलौला खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात झळकवले होते. यानंतर रोहितला कसोटीमध्ये शतक झळकवता आले नव्हते.

शतकांच्या ‘अर्धशतका’ समीप

भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दात आत्तापर्यत ११ शतक झळकावले आहेत. रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४७ शतके झळकावली आहेत. यामध्ये रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३१, टी-२० क्रिकेटमध्ये ५ तर कसोटी क्रिकेटमध्ये ११ शतके झळकावली आहेत.

रोहित-जडेजा जोडीची चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

रोहित-जडेजा जोडीने शिस्तबद्ध फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या खेळीमुळे ३३-३ बाद असलेला स्कोअर १३३- ३ बाद असा झाला. यामध्ये कर्णधार रोहित शर्माने ७२ चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यानंतर रोहित पाठोपाठ जडेजाने ९७ चेंडूत पाच चौकारांच्या सहाय्याने आपले अर्धशतक साजरे केले.

हेही वाचा :

Back to top button