Proton Mail | सायबर गुन्हेगारीसाठी वापर; प्रोटॉन मेलवर भारतात बंदीची शक्यता, केंद्राने जारी केली नोटीस | पुढारी

Proton Mail | सायबर गुन्हेगारीसाठी वापर; प्रोटॉन मेलवर भारतात बंदीची शक्यता, केंद्राने जारी केली नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वांत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमेल सेवेपैकी एक असलेली प्रोटॉन मेलवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. तामिळनाडू काही दिवसांपूर्वी ८ शाळांत बाँब ठेवल्याचा इमेल पोलिसांना पाठवण्यात आला होता. यासाठी प्रोटॉन मेलचा वापर झाला होता. त्यानंतर तामिळनाडू सरकारने केंद्राकडे प्रोटॉन मेलवर बंदीची मागणी केली होती. (Proton Mail)

प्रोटॉन मेल भारतात ब्लॉक करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. पण प्रोटॉन मेल भारतात ब्लॉक करण्याचे आदेश गुगल आणि अॅपलला दिले जाणार आहेत का याची माहिती उपलब्ध नाही. आयटी अॅक्टच्या कलम ६९अ नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याच कलमानुसार केंद्र सरकारची एक समिती कार्यरत असून ही समिती एखादी वेबसाईट किंवा अॅप भारतात ब्लॉक करण्याचा निर्णय घेते. (Proton Mail)

या बैठकीत तामिळनाडूच्या प्रतिनिधीने प्रोटॉन मेलचा वापर करून बाँब स्फोटांची धमकी देणारा इमेल पाठवल्याचे सांगितले. प्रोटॉन मेलची सेवा ही End to End Encrypted असते त्यामुळे पोलिसांना हा इमेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस शोधता आला नाही. या संदर्भात पोलिसांनी अगदी इंटरपोलचही मदत घेतली, पण पोलिसांना यश येऊ शकले नाही.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने नोटीस पाठवली असल्याचे प्रोटॉन मेलने मान्य केले आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, “अशा प्रकारे सर्वसामान्यांना इजा पोहोचवण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा आम्ही निषेध करतो. पण प्रोटॉन मेल ब्लॉक केल्याने सायबर गुन्हेगारांना रोखता येईल असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच हे गुन्हेगार जर भारताबाहेर असतील तर त्यांना कसे रोखणार हाही प्रश्न आहे. भारत सरकारला सर्वोतोपरी मदत केली जाईल, या संदर्भात आम्ही एकत्र काम करू. प्रोटोन मेलचा वापर बेकायदेशीर कामांसाठी केला जाऊ नये, ही आमची भूमिका आहे.”

हेही वाचा

 

Back to top button