जसप्रीत बुमराहची इंग्लंड विरुद्ध ‘कमाल’, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गाेलंदाज | पुढारी

जसप्रीत बुमराहची इंग्लंड विरुद्ध 'कमाल', अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गाेलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आज (दि. ३) टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्‍लंडच्‍या फलंदाजांची ‘परीक्षा’ घेतली. पहिल्या डावात त्याने सहा विकेट्स घेत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा मोठा रेकॉर्ड मोडला. त्‍याच्‍या या  स्‍मरणीय कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला. (Jasprit Bumrah Broke Record Of Umesh Yadav )

Jasprit Bumrah : कसोटीत सर्वात कमी चेंडूत टिपले १५० बळी

सहा विकेट्स घेऊन बुमराहने आज कसोटी क्रिकेटमधील १५० बळी पूर्ण केले. त्‍याचबराेबर  एक मोठा विक्रमही त्‍याने आपल्या नावावर केला. सर्वात कमी चेंडूत 150 बळी घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने 6781 चेंडूत १५० बळी घेतले आहेत. अशी कामगिरी करत त्‍याने भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा विक्रम मोडला. उमेशने 7661 चेंडूत 150 बळी पूर्ण केले होते. मोहम्मद शमी (7755 चेंडू)  तिसऱ्या स्थानावर आहे. तर कपिल देव (8378 चेंडू) चौथ्या स्थानावर आणि रविचंद्रन अश्विन (8380 चेंडू) पाचव्या स्थानावर आहे. (Jasprit Bumrah Broke Record Of Umesh Yadav )

Jasprit Bumrah :  ४५ धावांमध्‍ये ६ बळी, घरच्‍या मैदानावरील सर्वोत्तम कामगिरी

बुमराहने ४५ धावांत सहा बळी घेतले. या शतकातील घरच्या मैदानावर भारतीय वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. बुमराहची वैयक्‍तिक कसोटीतील ६ बळी ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने 2019 मध्ये किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 27 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. तर 2018 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 33 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. (Jasprit Bumrah Broke Record Of Umesh Yadav )

संबंधित बातम्या

अश्विनची पाचव्‍यांदा राहिली ‘पाटी कोरी’

रविचंद्रन अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. डावात एकही विकेट न मिळणे हे अश्‍विनबाबत पाचव्‍यांदा घडले आहे. यापूर्वी 2016इंग्लंड, 2017 श्रीलंका, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्‍या सामन्‍यात त्‍याला एकही विकेट मिळाली नव्‍हती.


हेही वाचा :

Back to top button