India vs England 2nd Test | यशस्वी जैस्वालचे द्विशतक, बनला अशी कामगिरी करणारा तिसरा सर्वात युवा भारतीय फलंदाज

India vs England 2nd Test | यशस्वी जैस्वालचे द्विशतक, बनला अशी कामगिरी करणारा तिसरा सर्वात युवा भारतीय फलंदाज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला. त्याने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केले. द्विशतकी कामगिरी करणारा तो तिसरा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. (India vs England 2nd Test) यशस्वी जैस्वालने २७७ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आणि त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताची धावसंख्या ३८० पार झाली. त्यानंतर जैस्वाल २०९ धावांवर बाद झाला. त्याचा झेल बेअरस्टोने टिपला.

यशस्वी जैस्वाल कसोटीत भारतासाठी द्विशतक करणारा तिसरा सर्वात यूवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी विनोद कांबळीने वयाच्या २१व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१व्या वर्षी एक द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकी खेळीमुळे भारताच्या धावसंख्येचा प्रवास ४०० च्या दिशेने वाटचाल केली.

भारताची सातवी विकेट ३६४ धावांवर पडली. रविचंद्रन अश्विन ३७ चेंडूत २० धावा करून बाद झाला. जेम्स अँडरसनने त्याला बेन फॉक्सकरवी झेलबाद केले. त्यानंतर यशस्वी २०९ धावांवर बाद झाला.

भारताने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पहिल्याच दिवशी ३३६ धावा ठोकल्या होत्या. या धावांमधील सर्वाधिक वाटा हा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा आहे. त्याने पहिल्या दिवसअखेर नाबाद १७९ धावा केल्या होत्या. शुक्रवारच्या दिवसात भारताच्या इतर सात फलंदाजांनी मिळून १५६ धावा केल्या. यात रोहितच्या १४, शुभमन गिलच्या ३४, अय्यरच्या २७, पाटीदारच्या ३२, अक्षरच्या २७, के. एस. भरतच्या १७, तर अश्विनच्या नाबाद ५ धावांचा समावेश आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; मात्र भारताने पहिल्याच सत्रात दोन फलंदाज गमावले. रोहित शर्मा १४, तर शुभमन गिल ३४ धावा करून बाद झाला होता.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news