Punjab Governor Resigned: पंजाबच्या राज्यपालांचा राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण? | पुढारी

Punjab Governor Resigned: पंजाबच्या राज्यपालांचा राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या  पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज (दि.३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार बनवारीलाल यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. (Punjab Governor Resigned)

राज्यपालांचा ‘या’ कारणांमुळे राजीनामा

मिळालेल्या माहितीनुसार, बनवारीलाल यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात बनवारीलाल यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे मी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा’ असे स्पष्ट केले आहे. (Punjab Governor Resigned)

‘मान’ सरकार अन् राज्यपालांमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद

दरम्‍यान, पंजाबमधील भगवंत मान सरकारसोबतच्या मतभेदामुळे बनवारीलाल पुरोहित यांनी राज्‍यपाल पदाचा राजीनामा दिल्‍याचीही चर्चा आहे . पंजाबचे भगवंत मान सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. राज्यपालांविरोधात मान सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन दिवसांपूर्वीही सीएम मान यांनी राज्यपालांवर निशाणा साधला होता. (Punjab Governor Resigned)

मुख्‍यमंत्री मान यांनी साधला होता राज्यपालांवर निशाणा

राज्यपाल आम्हाला त्रास देतात. राज्यात निवडून आलेले सरकार आहे. एकतर निवडून आलेले येथे राज्य करतील किंवा निवडलेले लोक राज्य करतील. लोकशाहीत निवडून आलेली सत्ता असते; परंतु बऱ्याच लोकांनी निवडलेल्या नियमाची सवय विकसित केली आहे. चंदीगडमधील महापौर निवडणुकीबाबत भगवंत मान भाजपवर हल्लाबोल म्हणाले हाेते की, राज्यपाल वेळोवेळी सांगतात की हे ‘कायदेशीर’ आहे आणि हे ‘बेकायदेशीर’ आहे. राज्यपाल ममता दीदींना बंगालमध्ये आणि आम्हाला पंजाबमध्ये खूप त्रास देतात, असा आरोप देखील मान यांनी राज्यपालांवर केला होता.

हेही वाचा:

Back to top button