IND vs SA Test Series : इशान पहिल्या कसोटीला मुकणार, ‘हा’ खेळाडू होणार यष्टीरक्षक | पुढारी

IND vs SA Test Series : इशान पहिल्या कसोटीला मुकणार, 'हा' खेळाडू होणार यष्टीरक्षक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे त्याने बीसीसीआयकडे रजेसाठी मागणी केली होती. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली. इशानला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी केएस भरत याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालेकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवण्यात येणार आहे. दुसरी आणि अंतिम कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. (IND vs SA Test Series)

कशी आहे इशानचे कसोटी क्रिकेटमधील कारकिर्द?

इशानने जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून त्याने २७ कसोटी आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने दोन कसोटीत ७८ धावा केल्या आहेत. या काळात ५२ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. इशानने ७८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. (IND vs SA Test Series)

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक) (IND vs SA Test Series)

केएस भरतची कसोटी कारकिर्द (IND vs SA Test Series)

केएस भरत या वर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पहिली कसोटी खेळला होता. तो आतापर्यंत टीम इंडियाकडून पाच कसोटी सामने खेळला आहे. त्याने १८.४३ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ४४ आहे. (IND vs SA Test Series)

हेही वाचलंत का?

Back to top button