MP CM Mohan Yadav on Mahakal : उज्जैनमध्ये रात्री ‘राजा’ राहत नाही! मध्य प्रदेशच्या नूतन मुख्यमंत्र्यांनी दिला अंधश्रद्धेला छेद | पुढारी

MP CM Mohan Yadav on Mahakal : उज्जैनमध्ये रात्री 'राजा' राहत नाही! मध्य प्रदेशच्या नूतन मुख्यमंत्र्यांनी दिला अंधश्रद्धेला छेद

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये वर्षानुवर्षे एक दंतकथा होती की, येथे रात्री कोणीही राजा मुक्‍काम करु शकत नाही. या कारणास्तव कोणताही नेता येथे रात्री थांबला नाही.  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी हा समज मोडीत काढला आहे. त्‍यांनी रात्री उज्जैनमध्येच मुक्‍काम करत या अंधश्रद्धेला छेद दिला आहे. (MP CM Mohan Yadav)

‘महाकाल’ संपूर्ण विश्वाचा राजा : मुख्यमंत्री मोहन यादव

एका सभेदरम्यान उज्जैनमधील दंतकथेवर बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले, “मी भगवान महाकालचा पुत्र आहे. आम्ही बाबा महाकालची लेकरे आहोत. बाबा महाकाल हा संपूर्ण विश्वाचा राजा आहे. त्यामुळे मी येथे राहू शकतो. सिंधिया महाराज यांना आपल्या राजकीय धोरणाचा भाग म्हणून आपली राजधानी उज्जैन येथून ग्वाल्हेरला हलवावी लागली हाेती. रात्रीच्या अंधारात उज्जैनवर कोणताही हल्ला होऊ नये, यासाठी या दंतकथेची (समज) निर्मिती झाली, असे स्पष्ट करत राजा महाकाल हा संपूर्ण विश्वाचा राजा आहे.” (MP CM Mohan Yadav)

हेही वाचा:

Back to top button