

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (दि.१७) दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा विमानतळावरून शहराच्या दिशेने निघाला. त्यावेळी मोदी यांनी आपल्या वाहनाचा ताफा बाजूला घेत एका रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. (PM Modi)
गिलाट बाजाराजवळ पीएम मोदींनी मागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दिला. यासाठी पंतप्रधानांचा ताफा बाजूला झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कार्यकर्त्यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. (PM Modi)
हेही वाचा