ENG vs PAK : इंग्लंडकडून पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव | पुढारी

ENG vs PAK : इंग्लंडकडून पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपल्या अंतिम साखळी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. त्याचवेळी एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तान आणि इंग्लंडचा प्रवास संपला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि अखेर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता 15 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर, 16 नोव्हेंबरला दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिय आणि दक्षिण आफ्रिक यांच्यात होणार आहे. हा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात होणार आहे.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमावून 337 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 84, जो रूटने 60 आणि जॉनी बेअरस्टोने 59 धावा केल्या. डेव्हिड मलानने 31, हॅरी ब्रूकने 30 आणि जोस बटलरने 27 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने तीन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. इफ्तिखार अहमदने एक विकेट घेतली.

इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 244 धावा केल्या. आघा सलमानने सर्वाधिक ५१ धावा केल्या. कर्णधार बाबरने 38 तर रिजिवानने 36 धावा केल्या. शेवटी हरिस रौफने 35 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने तीन बळी घेतले. आदिल रशीद, गुस ऍटकिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button