NZ vs SL : श्रीलंकन फलंदाजांचे किवी गोलंदाजी पुढे लोटांगण | पुढारी

NZ vs SL : श्रीलंकन फलंदाजांचे किवी गोलंदाजी पुढे लोटांगण

पुढारी ऑनलाईन डेस्क :   प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावांवर आटोपला. यामध्ये कुसल परेराने सर्वाधिक 51 धावा केल्या. तिक्षीनाने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकाची सुरुवात खराब झाली. तीन धावांवर लंकेची पहिली विकेट पडली. निशांकाला आपले खातेही उघडता आले नाही. सौदीने त्याला आऊट केले. यानंतर परेराने वेगाने धावा केल्या, पण दुसऱ्या बाजून विकेट पडत राहिल्या. कर्णधार मेंडिस सहा धावा करून बाद झाला. समरविक्रमाने तर चारिथ असलंकाने आठ धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कुसल परेराही ५१ धावांवर बाद झाला. पॉवरप्लेनंतर श्रीलंकेची धावसंख्या ७४/५ अशी होती.

यानंतर लंकेची धावगती कमी आली. पण विकेट पडत राहिल्या. अँजेलो मॅथ्यूज 16 धावा करून बाद झाला तर धनंजय डी सिल्वा 19 धावा करून बाद झाला. चमिका करुणारत्नेही सहा धावा करून बाद झाला. दुष्मंथा चमीराने एक धाव घेतली. अखेरच्या विकेटसाठी महिष तिक्षीनाने दिलशान मदुशंकासोबत ४३ धावांची भागीदारी केली आणि संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने तीन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सामन्या दरम्यान पावसाची शक्यता

न्यूझीलंडच्या अखेरच्या साखळी सामन्यावर पावसाचा धोका आहे. न्यूझीलंडचे आठ गुण आहेत. पावसामुळे सामना रद्द झाल्यास किंवा सामन्यात पराभूत झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर होवू शकतात. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यांच्यासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेही आठ गुण आहेत. चांगल्या नेट रन रेटमुळे न्यूझीलंड गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत.

संघ :

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुहनका.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅंटनर, टॉम लॅथम (विकेटकीपर), टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

हेही वाचा : 

Back to top button