AFG vs AUS : विश्वचषकात अफगाणिस्तानचा अनोखा विक्रम! जाणून घ्या आकडेवारी

AFG vs AUS : विश्वचषकात अफगाणिस्तानचा अनोखा विक्रम! जाणून घ्या आकडेवारी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : AFG vs AUS ICC ODI World Cup 2023 : यंदाच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत छोट्या संघांनी चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: अफगाणिस्तानचा संघ या स्पर्धेत वर्चस्व गाजवत आहे. हा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत असून सध्या ते ग्रुप स्टेजमधील 8वा सामना खेळत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानने इतर कोणत्याही संघाला न जमलेला एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अफगाणिस्तान 'या' बाबतीत सर्व संघांच्या पुढे (AFG vs AUS ICC ODI World Cup 2023)

अफगाणिस्तान संघ आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीत फलंदाजांनीही महत्त्वाचे योगदान दिले आहे. पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वात कमी विकेट्स गमावणारा हा संघ ठरला आहे. म्हणजेच सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये सर्व 9 संघांनी अफगाणिस्तानपेक्षा जास्त विकेट गमावल्या आहेत. हे आश्चर्यकारक आहे. अफगाण संघाची ही कामगिरी भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांपेक्षाही चांगली असून त्यांचे सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत फक्त 7 फलंदाज बाद झाले आहेत.

विश्वचषक 2023 मध्ये पहिल्या 10 षटकात कमीत कमी विकेट गमावणारे संघ

7 विकेट्स : अफगाणिस्तान
9 विकेट्स : ऑस्ट्रेलिया
9 विकेट्स : न्यूझीलंड
9 विकेट्स : भारत
9 विकेट्स : पाकिस्तान

उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी (AFG vs AUS ICC ODI World Cup 2023)

अफगाण संघाचे आतापर्यंत 7 सामन्यांतून 4 विजयांसह 8 गुण झाले आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे सध्या आठ गुण आहेत पण नेट रनरेटमध्ये अफगाणिस्तानचा संघ मागे आहे. अफगाणिस्तानचा आज आठवा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. तर द. आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. अफगाणिस्तानने दोन्ही सामने जिंकल्यास 12 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. पराभवानंतरही त्याच्या आशा जिवंत राहण्याची शक्यता आहे. पण त्यांना इतर संघांच्या जय-पराजयावर अवलंबून राहावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news