ICC Men’s Cricket World Cup 2023 | टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पंड्या संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर | पुढारी

ICC Men's Cricket World Cup 2023 | टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पंड्या संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर

पुढारी ऑनलाईन : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या जखमी असल्याने तो संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला स्थान दिले आहे. (ICC Men’s Cricket World Cup 2023)

संबंधित बातम्या

 टीम इंडियाचा पुढील सामना ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. पण उपांत्य फेरीपर्यंत पंड्या तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता पंड्याला वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी आतापर्यंत १७ एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यात त्याने २९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर टी-२० मध्ये ४ विकेट्स आहेत. आता कोलकाता येथे होणार्‍या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा प्लेईंग इलेव्हन संघ काय असेल याकडे लक्ष लागले आहे. आता हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. (ICC Men’s Cricket World Cup 2023)

या ‍‍वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. गेल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून भारतीय संघ उपांत्य फेरी गाठली. सध्या टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button