David Willey : इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती | पुढारी

David Willey : इंग्लंडच्या 'या' अष्टपैलू खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतामध्ये क्रिकेटचा उस्तव सुरू असताना इंग्लंडच्या चांगल्या अष्टपैलू खेळाडूच्या कारकिर्दीला पुर्णविराम मिळाला आहे.  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (टी-20, वन-डे, कसोटी) निवृत्ती घेतली आहे. डेव्हिड विली वन-डे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये इंग्लंड संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. सध्याच्या वन-डे वर्ल्डकपमध्ये गतवितेत्या इंग्लड संघाने स्पर्धेत सुमार कामगिरी केली आहे. इंग्लंडने स्पर्धेत ६ सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. (David Willey)

कुटुंबाचे आभार मानले

जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह पांढऱ्या चेंडू संघाचा भाग बनणे ह्यासाठी मी खूप भाग्यवान आहे. कारकिर्दीत मी काही खास आठवणी आणि चांगले मित्र बनवले यासह अत्यंत कठीण काळातून गेलो. डेव्हिड विली पुढे म्हणाला की, माझी पत्नी, दोन मुले, आई आणि वडील आणि तुमच्या पाठिंब्याशिवाय मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकलो नसतो. विशेष आठवणी शेअर केल्याबद्दल आणि मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. मी आपला सदैव कृतज्ञ आहे.

डेव्हिड विलीची कारकिर्द

डेव्हिड विलीने 2015 मध्ये इंग्लंडकडून वनडे पदार्पण केले होते. पण खराब फॉर्ममुळे त्याला संघातील स्थान पक्के करता आले नव्हते. त्याने इंग्लंडकडून 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये 94 आणि 43 टी-20 सामन्यात 51 बळी घेतले. त्याने इंग्लंडसाठी एकहाती सामने जिंकले आहेत. सध्या भारतात होत असलेल्या वन-डे वर्ल्डकप संघात तो अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या T20 वर्ल्डकप स्पर्धेतही तो इंग्लंड संघाचा सदस्य होता.

हेही वाचा :

Back to top button