पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कोझिकोड हे शहर 'साहित्य' अन् मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा 'संगीता'चे शहर म्हणून युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. युनेस्कोच्या यादीत भारतातील केरळमधील 'कोझिकोड' आणि मध्य प्रदेशातील 'ग्वाल्हेर' शहराला विशेष स्थान देण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी त्यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून दिली आहे. (UNESCO Creative Cities)
युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये भारतातील ग्वाल्हेर आणि कोझिकोड या शहरांच्या नावांचा समावेश केला आहे. युनेस्कोने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची घोषणा केली आहे. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार ग्वाल्हेर आणि कोझिकोडसह जगातील ५५ शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरने 'संगीत' श्रेणीत, तर केरळच्या कोझिकोडचा 'साहित्य' श्रेणीत युनोस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (UNESCO Creative Cities)
युनेस्कोने जगभरातील ५५ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उझबेकिस्तानमधील बुखारा शहर–हस्तकला आणि लोककला, मोरोक्कोमधील कॅसाब्लांका शहर – मीडिया आर्ट, चीनमधील चोंगकिंग शहर – डिझाइन, नेपाळमधील काठमांडू – चित्रपट, ब्राझीलमधील रिओ दि जानेरो या शहराचा 'साहित्य' साठी युनेस्कोच्या यादीच समावेश करण्यात आला आहे. या यादीत आतापर्यंत १०० हून अधिक देशांतील ३५० शहरांचा समावेश करण्यात आला आहे. (UNESCO Creative Cities)
UNESCO ने जारी केलेल्या निवेदनानुसार, या नवीन शहरांचा त्यांच्या विकास धोरणांचा भाग म्हणून युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. संस्कृती आणि सर्जनशीलतेचा वापर करण्याच्या दृढ वचनबद्धतेसाठी आणि मानव-केंद्रित शहरी नियोजनातील नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रदर्शन करण्यासाठी यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे देखील युनेस्कोने म्हटले आहे. (UNESCO Creative Cities)