मुंबईत क्रिकेट सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही : ‘बीसीसीआय’ सचिव जय शाह

बीसीसीआय सचिव जय शहा ( संग्रहित छायाचित्र )
बीसीसीआय सचिव जय शहा ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पर्यावरणाच्‍या समस्‍येविरुद्‍ध लढण्‍यासाठी कटिबद्ध आहे, असे स्‍पष्‍ट करत भारत आणि श्रीलंका क्रिकेट सामन्‍यानंतर मुंबईत ( Mumbai ) वानखेडे स्‍टेडियमवर (Wankhede Stadium) .विश्‍वचषक स्‍पर्धेतील सामन्‍यानंतर फटाक्यांची आतषबाजी होणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी म्‍हटले आहे.

'बीसीसीआय' पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध

एका निवेदनात जय शहा यांनी म्‍हटले आहे की, भारतातील सर्वोच्‍च क्रिकेट संस्‍था 'बीसीसीआय' पर्यावरणाबाबत संवेदनशील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोणतेही फटाके फाेडण्‍यात येणार नाहीत, असा  निर्णय घेण्‍यात आला आहे. बीसीसीआय पर्यावरणीय समस्यांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे. त्‍याचबरोबर चाहत्‍ये आणि भागधारकांच्या हितांना नेहमीच अग्रस्थानी ठेवले आहे.

बीसीसीआय पर्यावरणाच्या संदर्भात संवेदनशील आहे. मुंबईत वानखडे स्‍टेडियमवर कोणत्‍याही प्रकारे फटाक्‍यांची आतषबाजी होणार नाही, असे मी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडले आहे. फटाक्‍यांच्‍या आतषबाजीमुळे प्रदूषणाची पातळी वाढू शकते. बीसीसीआयने मुंबई आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेबाबत तातडीची चिंता मान्य केली आहे. आम्ही क्रिकेटच्या सेलिब्रेशनला साजेशा पद्धतीने आयसीसी विश्वचषक आयोजित करण्याचा प्रयत्न करत असताना, आमच्या सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी वचनबद्धतेवर आहोत, असेही जय शहा यांनी आपल्‍या निवदेनात म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news