Air Pollution Index : चिंताजनक! जगातील प्रदूषित १० देशांमध्ये भारत, मुंबई ‘या’ स्थानी

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणार्‍या IQAir या स्वीडिश कंपनीने मोजलेल्या १०९ शहरांपैकी मुंबई दुसऱ्या तर दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक प्रदूषित हवा चीनची राजधानी बीजिंगमध्ये होती, जी १०९ देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकात भारताचा समावेश पहिल्या १० देशांमध्ये झाला आहे. (Air Pollution Index)

Air Pollution Index : जगभरातील प्रदुषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणार्‍या IQAir या स्वीडिश कंपनीने मोजलेल्या १०९ शहरांपैकी मुंबई जगभरातील शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. सोमवारी (दि.२३) संध्याकाळ पर्यंत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा स्कोअर AQI १६० होता.  दिल्लीत सध्या मुंबईच्या तुलनेत कमी वायू प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स स्कोअर मोजण्याचे एकके अमेरिकन प्रणालीवर आधारित आहेत. जेथे ०-५० सर्वोत्तम मानले जातात आणि ३०० पेक्षा जास्त धोकादायक मानले जातात. ५१-१०० मधील स्कोअर मध्यम आहेत, १०१-१५० मधील स्कोअर लहान मुलांसाठी आणि संवेदनशील गटांसाठी अस्वास्थ्यकर आहेत, १५१-२०० मधले स्कोअर हे अस्वास्थ्यकर आहेत, २०१ ते ३०० खूप अस्वस्थ आहेत.

भारताच्या जीडीपीवरही परिणाम…

भारतातील मुंबई आणि दिल्ली व्यतिरिक्त अहमदाबाद या शहराचाही या यादीत समावेश आहे. २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे भारताला अंदाजे २८.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताच्या जीडीपीवरही परिणाम झाला. अशा परिस्थितीत भारत सरकार वायू प्रदूषणाबाबत काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पाटणा आणि चेन्नई इत्यादी शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट झाली होती, या वेळीही तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news