National Games 2023 Goa : नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र बॉक्सिग संघाच्या कोचपदी मोरे यांची निवड | पुढारी

National Games 2023 Goa : नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र बॉक्सिग संघाच्या कोचपदी मोरे यांची निवड

जळगाव पुढारी वृत्तसेवा : गोवा येथे होणाऱ्या बॉक्सिंगच्या 37 व्या नॅशनल गेमसाठी महाराष्ट्र बॉक्सिंग संघाचे कोच म्हणून नरेंद्र अरुण मोरे यांची निवड महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. (National Games 2023 Goa)

गोवा येथे 1 ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान होत असलेल्या 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र बॉक्सिंग टीमचे कोच म्हणुन भुसावळ येथील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष तथा एन आय एस कोच नरेंद्र अरुण मोरे यांची महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button