Lionel Messi Wins Ballon d’Or : लिओनेल मेस्सीने आठव्यांदा जिंकला ‘बॅलन डी’ओर’ किताब | पुढारी

Lionel Messi Wins Ballon d’Or : लिओनेल मेस्सीने आठव्यांदा जिंकला 'बॅलन डी'ओर' किताब

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने विक्रमी आठव्यांदा बॅलन डी’ओर किताब जिंकला आहे. या विजेतेपदाच्या शर्यतीत त्याने मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हॅलँडचा पराभव केला. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने गेल्या वर्षी फिफा विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेत त्याने ७ गोलसोबत ३ असिस्ट करून गोल्डन बॉल जिंकला होता. मेस्सीने यापूर्वी २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये बॅलन डी’ओ’वर नाव कोरले आहे.

संबंधित बातम्या :

मँचेस्टर युनायटेडचे ​​माजी खेळाडू आणि इंटर मियामीचे सहमालक डेव्हिड बेकहॅम यांनी पॅरिसमध्ये मेस्सीला पुरस्कार प्रदान केला. मेस्सीपूर्वी, सध्याच्या कोणत्याही MLS खेळाडूने बॅलन डी’ओर जिंकला नव्हता. अनेक माजी विजेत्यांनी अमेरिकेत आपली कारकीर्द संपवली आहे, परंतु लीगमधील सक्रिय खेळाडू म्हणून हा पुरस्कार जिंकणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू ठरला आहे.

बॅलन डी’ओरच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एर्लिंग हॅलंडने मात्र गर्ड मुलर ट्रॉफी जिंकली. गेल्या मोसमात त्याने ५२ गोल केले होते. त्याचा संघ मँचेस्टर सिटीने ट्रेबल जिंकला होता. आठव्यांदा बॅलोन डी’ओर जिंकल्यानंतर मेस्सी म्हणाला, ‘मी कारकिर्दीत जे यश मिळवले त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. मला जगातील सर्वोत्तम संघ आणि इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघाकडून खेळण्याचा मान मिळाला. या वैयक्तिक ट्रॉफी जिंकणे छान आहे. कोपा अमेरिका आणि विश्व कप जिंकणे अद्भूत आहे. हे सर्व (बॅलॉन डी’ओर पुरस्कार) अवॉर्ड वेगवेगळ्या कारणांनी विशेष आहेत.

मेस्सीच्या आधी, बार्सिलोना आणि स्पेनच्या मिडफिल्डर एटाना बोनामतीने बॅलोन डी’ओर जिंकला. स्पेनला विश्वचषक विजेतेपदापर्यंत नेण्याआधी, त्याने गेल्या मोसमात बार्सिलोनाला लीगा एफ आणि चॅम्पियन्स लीग जिंकण्यास मदत केली. इतर पुरस्कारांमध्ये, मेस्सीचा अर्जेंटिनाचा सहकारी एमिलियानो मार्टिनेझ याने सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठी यशिन ट्रॉफी जिंकली. तसेच २१ वर्षांखालील जगातील अव्वल खेळाडू म्हणून इंग्लंड आणि रिअल माद्रिदचा मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम याला कोपा ट्रॉफी देण्यात आली.

बॅलन डी’ओर टॉप 10

1. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना आणि PSG/इंटर मियामी)

2. एर्लिंग हॅलँड (नॉर्वे आणि मँचेस्टर सिटी)

3. कायलियन एमबाप्पे (फ्रान्स आणि पीएसजी)

4. केविन डी ब्रुयन (बेल्जियम आणि मँचेस्टर सिटी)

5. रॉड्रि (स्पेन आणि मँचेस्टर सिटी)

6. विनिशियस जूनियर (ब्राझील आणि रियल माद्रिद)

7. ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना आणि मँचेस्टर सिटी)

8. व्हिक्टर ओसिमहेन (नायजेरिया आणि नेपोली)

9. बर्नार्डो सिल्वा (पोर्तुगाल आणि मँचेस्टर सिटी)

10. लुका मॉड्रिक (क्रोएशिया आणि रिअल माद्रिद)

हेही वाचा : 

Back to top button