Australia T20I squad against India | भारताविरुद्ध T20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची कमान मॅथ्यू वेडच्या हातात

Australia T20I squad against India | भारताविरुद्ध T20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची कमान मॅथ्यू वेडच्या हातात

पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या T20I मालिकेसाठी १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. मॅथ्यू वेड भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियन संघातील ८ खेळाडू भारतातच थांबणार आहेत. कारण त्यांची भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी १५ खेळाडूंच्या संघात निवड झाली आहे. (Australia T20I squad against India)

संबंधित बातम्या 

ऑस्ट्रेलियन संघाने २३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणम येथून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी आज शनिवारी त्यांचा संघ जाहीर केला. मॅथ्यू वेड याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.

विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघातील जोश इंग्लिस आणि सीन अॅबॉट आणि राखीव खेळाडू तन्वीर संघा हेदेखील भारतातच राहणार आहेत. तर आयपीएल स्टार टीम डेव्हिड, मॅट शॉर्ट आणि नॅथन इलिस हे विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील होतील.

पॅट कमिन्स विश्वचषक स्पर्धेनंतर मायदेशी परतेल आणि तो ऑस्ट्रेलियात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी सराव करेल. तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि कॅमेरॉन ग्रीन हे खेळाडू भारताविरुद्धच्या T20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात सहभागी होतील. (Australia T20I squad against India)

"आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच संधी मिळालेल्या खेळाडूंचा समावेश असलेला हा अनुभवी संघ आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या T20 संघातून महत्त्वाचे खेळाडू तयार होतील," असे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाचा T20I संघ

मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन इलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा.

T20I मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20I सामना – २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरा T20I सामना – २६ नोव्हेंबर, तिरुवनंतपुरम
तिसरा T20I सामना – २८ नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा T20I सामना – १ डिसेंबर, नागपूर
पाचवा T20I सामना – ३ डिसेंबर: हैदराबाद

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news