Jarvo in India-Australia Match : भारत-ऑस्ट्रोलिया सामन्यातील जार्वोच्या एन्ट्रीने कोहली संतापला; आयसीसीची कारवाई

Jarvo in India-Australia Match : भारत-ऑस्ट्रोलिया सामन्यातील जार्वोच्या एन्ट्रीने कोहली संतापला; आयसीसीची कारवाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच जार्वो अचानक मैदानात घुसला. त्याने 'जार्वो 69' नावाची भारतीय जर्सी घातली होती. जार्वोला पाहून विराट कोहलीला राग आला. त्याने जार्वोला बाहेर जायला सांगितले. यष्टिरक्षक केएल राहुल आणि इतर खेळाडूही संतप्त दिसले. शेवटी सिक्युरिटीने जार्वोला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जार्वोवर कठोर कारवाई केली आहे. जार्वोवर कोणत्याही विश्वचषकाच्या सामन्याला उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Jarvo in India-Australia Match)

इंग्लंडचा जार्वो हा YouTuber आणि प्रँकस्टर आहे. त्याचे खरे नाव डॅनियल जार्विस आहे. तो त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी अशा विचित्र गोष्टी करतो. जार्वोने यापूर्वी भारताच्या सामन्यातही असेच केले होते. 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यातही जार्वोने असंच काहीसं केले होते. त्यानंतरही सामन्यादरम्यान तो भारतीय जर्सी घालूनच मैदानात उतरला होता. मात्र, त्यावेळी मैदानात घुसल्याने जार्वोला शिक्षा झाली. यॉर्कशायरच्या इंग्लिश काउंटीने जार्वोवर हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडवर आजीवन बंदी घातली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news