Asian Para Games 2023 | बॅडमिंटनमध्ये सुकांत कदमला कांस्य तर चौघे सुवर्णपदकाच्या शर्यतीत | पुढारी

Asian Para Games 2023 | बॅडमिंटनमध्ये सुकांत कदमला कांस्य तर चौघे सुवर्णपदकाच्या शर्यतीत

पुढारी ऑनलाईन : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळांडूकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. आज सुकांत कदम याने पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी SL-4 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसह कांस्यपदक मिळवले. दरम्यान, बॅडमिंटन एकेरीच्या SL-३ मध्ये भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. प्रमोद भगत, नितेश कुमार आणि सहास यांनी एकेरीच्या SL-३ च्या सेमी फायनल सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे तिघांचे पदक निश्चित झाले असून ते आता सुवर्णपदकासाठी खेळणार आहेत.

तसेच कृष्णा नगर बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SH 6 स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने चीनच्या लिन नाइली याचा २१-१९, १८-२१, २३-२१ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

दरम्यान, पुरुषांच्या शॉट पुट-F46 मध्ये भारताने २ पदके मिळवली. सचिन खिलारीने १६.०३ च्या जबरदस्त थ्रोसह सुवर्ण कामगिरी केली. त्याने एक गेम रेकॉर्डही केला, तर रोहित हुडा याने याच क्रीडा प्रकारात कांस्य मिळवले.

हे ही वाचा :

Back to top button