पुढारी ऑनलाईन डेस्क : शीतल देवी आणि सरिता अधना यांना आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये महिला दुहेरी कंपाउंड सांघिक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अखेरच्या सुवर्ण सामन्यात चीनच्या लिन/झांग यांच्याकडून १५०-१५२ असा पराभव झाला.
दरम्यान, नेमबाजीत मानसी जोशीलाही कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. मानसीला महिला एकेरीच्या SL3 स्पर्धेत उपांत्य फेरी गाठता आली नाही, ती इंडोनेशियाच्या स्याकुरोह कोनिताहकडून १०-२१, १४-२१ ने पराभूत झाली.
संबंधित बातम्या :
आशियाई पॅरा गेम्समध्ये पूजाने महिलांच्या F54/F55 डिस्कस थ्रो इव्हेंटमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. टेबल टेनिस वर्ग १ पुरुष एकेरीमध्ये संदीप डांगीने ४ पैकी २ सामने जिंकून कांस्यपदक मिळवले. तर भारताच्या हॅनीने पुरुषांच्या भालाफेक F37 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने ५५.९७ मीटर थ्रो फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले
या स्पर्धेत बॅडमिंटन मिश्र दुहेरी SL3-SU5 मध्ये भारताने आणखी एक पदक पटकावले आहे. नितेश कुमार आणि तुलसीमाथी मुरुगेसन यांनी कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या श्रेयांश त्रिवेदीने पुरुषांच्या २०० मीटर टी -३७ धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. २५.२६ सेकंदात त्याने ही कामगिरी केली. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला.
आशियाई पॅरा गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्येही खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये भारताच्या सुमित अंतिलने इतिहास रचला. पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदकावर नाव कोरले.
हेही वाचा :