IND vs BAN Hardik Pandya : टीम इंडियाचं टेंशन वाढलं, हार्दिक पंड्या विश्वचषकातून बाहेर?

IND vs BAN Hardik Pandya : टीम इंडियाचं टेंशन वाढलं, हार्दिक पंड्या विश्वचषकातून बाहेर?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे विश्वचषकात आज (दि.१९) भारत आणि बांगलादेश आमने-सामने आहेत. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र असोशिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. विश्वचषकातील हा भारताचा चौथा सामना आहे. बांगलादेशने भारतासमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले आहे. तत्पूर्वी भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. (IND vs BAN Hardik Pandya)

अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. सध्या मेडिकल टीम त्याच्या दुखापतीकडे लक्ष देत आहे. त्यानंतरच ती किती गंभीर आहे हे कळेल. दरम्यान, हार्दिकला झालेली दुखापत किती गंभीर आहे? तो विश्वचषकातील पुढील सामने खेळू शकणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. (IND vs BAN Hardik Pandya)

बांगलादेशचा फलंदाज लिटन दास याने नवव्या षटकात चेंडू फटकावला. हार्दिकने यावेळी पायाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिकच्या पायावर ताण पडला. यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी आला होता. मात्र, त्याला गोलंदाजी करताना धावता आले नाही. कर्णधार रोहित शर्माने अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीशी संवाद साधला. दोघांनीही कोणतेही जोखीम न घेण्याचे ठरवले. (IND vs BAN Hardik Pandya)

कोहली आणि रोहितने हार्दिकशी बोलून त्याला मैदान सोडण्यास सांगितले. हार्दिकने गोलंदाजीचा हट्ट सोडला आणि तो मेडिकल टीमसोबत बाहेर पडला. त्यामुळे हार्दिकला बाहेर जावे लागले. हार्दिकचे षटक विराटने पूर्ण केले. हार्दिकला स्कॅनसाठी नेण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक स्टेडियममध्ये परतला आहे. (IND vs BAN Hardik Pandya)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news