Hitman Rohit Sharma : रोहित शर्माचा धमाका! मोडला ब्रायन लाराचा ‘हा’ विक्रम | पुढारी

Hitman Rohit Sharma : रोहित शर्माचा धमाका! मोडला ब्रायन लाराचा ‘हा’ विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hitman Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हिटमॅनच्या बॅटने आतापर्यंत या स्पर्धेत भरपूर धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध खळबळ माजवल्यानंतर रोहितने पाकिस्तानच्या गोलंदाजीचाही धुव्वा उडवला. बांगलादेशविरुद्धही भारतीय संघाला हिटमॅनकडून अशाच खेळी केली. पुण्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहितने ब्रायन लाराच्या मोठा विक्रम मोडला.

रोहितने गाठला मोठा टप्पा

रोहित शर्माने आणखी एक मोठा टप्पा गाठला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकले. लाराने 1992 ते 2007 दरम्यान आपल्या कारकिर्दीत एकूण पाच विश्वचषक खेळले. या काळात त्याने 1,225 धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध 48 धावा करणारा हिटमॅन तिसरा वनडे विश्वचषक खेळत आहे.

रोहितने आपल्या तिसऱ्या विश्वचषकात केवळ चार सामने खेळले आहेत. आपल्या स्फोटक खेळीच्या जोरावर तो आता लाराच्या पुढे गेला आहे. लाराने 34 विश्वचषक सामन्यांमध्ये 42.24 च्या सरासरीने दोन शतके आणि 7 अर्धशतके झळकावली होती. तर रोहितने 21वा विश्वचषक सामना खेळला आहे. यात त्याने आतापर्यंत 68.66 च्या सरासरीने 1,243 धावा केल्या आहेत. या काळात त्याने सात शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2003 ते 2015 या चार विश्वचषकांमध्ये 56.74 च्या सरासरीने 1532 धावा केल्या आहेत. संगकाराचा विक्रम मोडण्यासाठी हिटमॅन अद्याप 296 धावांची गरज आहे.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 45 डावांमध्ये 2,278 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण सहा विश्वचषक खेळले. या काळात त्याने 56.95 च्या सरासरीने खेळताना सहा शतके आणि 15 अर्धशतके झळकावली. दुसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 46 सामन्यांमध्ये 1,743 धावा केल्या. पाँटिंगच्या नावावर विश्वचषकात पाच शतके आणि सहा शतके आहेत.

हिटमॅन जबरदस्त फॉर्मात

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची बॅट आतापर्यंत जोरदार बरसली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी त्यानंतर त्याने आपल्या बॅटने धमाकेदार कामगिरी केली आहे. हिटमॅनने अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची संस्मरणीय खेळी खेळली केली. तर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय कर्णधाराने 86 धावांची विजयी खेळी साकारली होती.

Back to top button