पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे विश्वचषकात आज (दि.१९) भारत आणि बांगलादेश आमने-सामने आहेत. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र असोशिएशनच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. विश्वचषकातील हा भारताचा चौथा सामना आहे. तर शुभमन गिला हा त्याचा विश्वचषकातील दुसरा सामना खेळत आहे. बांगलादेशने भारतासमोर २५७ धावांचे आव्हान ठेवले आहे. (Sara Tendulkar Shubman Gill)
दरम्यान, बांगलादेशच्या २५७ आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शुभमन गिलने जोरादार फटकेबाजी केली आहे. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३६ चेंडूमध्ये ४० धावा केल्या असून तो क्रिजवर टिकून आहे. दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरही पोहोचली आहे. शुभमन गिलने षटकार लगावल्यानंतर सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया चर्चेचा विषय बनली आहे. तिचा भारतीय संघाला सपोर्ट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Sara Tendulkar Shubman Gill)
शुभमनने जोरदार फटकेबाजीचं नाही तर क्षेत्ररक्षण करतानाही योगदान दिले आहे. गिलने ३८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तौहीदचा झेल घेतला. या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. शार्दुलने चेंडू टाकला, जो फलंदाजाने लेग साईडला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत गेला आणि थेट शुभमन गिलने झेल पकडला.
गिलने झेल पकडल्यानंतर साराच्या आनंदाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. व्हायरल रिअॅक्शनमध्ये सारा तेंडुलकर हसत टाळ्या वाजवताना दिसत आहे. या झेलद्वारे बांगलादेशने डावातील पाचवी विकेट गमावली. तौहिद ३५ चेंडूमध्ये १६ धावा करत तंबूत परतला आहे. (Sara Tendulkar Shubman Gill)