Karthikeyan Murali : मुरली कार्तिकेयनने रचला इतिहास; दिग्गज बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला केले पराभूत

Karthikeyan Murali
Karthikeyan Murali

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा बुद्धिबळपटू कार्तिकेयन मुरलीने विशेष कामगिरी केली आहे. २४ वर्षीय मुरलीने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू असलेल्या मॅग्नस कार्लसनला क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत पराभूत केले आहे. कार्लसनला पराभूत करणारा मुरली हा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी पंतला हरिकृष्ण आणि विश्वनाथन आनंद यांनी ही कामगिरी केली होती. कार्तिकेयनने स्पर्धेच्या सातव्या फेरीत विजय मिळवला. (Karthikeyan Murali)

हा महत्वपूर्ण विजय मिळवल्यानंतर कार्तिकेयन मुरली हा एस.एल नारायण, जावोखिर सिंदारोव, डेव्हिड परव्यान, अर्जुन एरिगे आणि नोदिरबेक याकुबोएव यांसारख्या स्पर्धेतील प्रमुख खेळाडूंच्या पंक्तीत सामील झाला. या सर्वांनी ७ पैकी ५.५ गुण मिळवले आहेत. तामिळनाडूच्या तंजावर येथील राहिवासी असणारा मुरली दोन वेळेस नॅशनल चॅम्पियन बनला आहे. त्याने कार्लसन विरोधात खेळताना कोणतीही चूक केली नाही. (Karthikeyan Murali)

कार्तिकेयन मुरली मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी, भारताच्या पंतला हरिकृष्ण याने २००५ मध्ये कार्लसनचा पराभव केला होता. जेव्हा कार्लसन १४ वर्षांचा होता, आणि कार्लसनला पराभूत करणारा विश्वनाथन आनंद हा एकमेव भारतीय खेळाडू होता. (Karthikeyan Murali)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news