पुढारी ऑनलाईन : वन-डे (एकदिवसीय ) वर्ल्ड कपमध्ये आज (दि.१४) भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये सलामीवर शुभमन गिलचे पुनरागमन झाले आहे. यामुळे इशान किशनला बाहेर बसावे लागले आहे. भारताने टाॅस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (India vs Pakistan Playing XI)
संबंधित बातम्या
सध्या टीम इंडिया जोरदार फॉर्ममध्ये आहे. वन डे वर्ल्डकपच्या इतिहासातील भारत आणि पाकिस्तान संघातील ही आठवी लढत आहे. आतापर्यंत झालेल्या सात लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तर पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंका संघाचा पराभव केला आहे. (India vs Pakistan Playing XI)
भारतीय संघ: शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान संघ : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
हे ही वाचा :