IND vs PAK : विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबादमध्ये दाखल, सचिन तेंडुलकर-दिनेश कार्तिकसोबत फोटोसेशन    | पुढारी

IND vs PAK : विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबादमध्ये दाखल, सचिन तेंडुलकर-दिनेश कार्तिकसोबत फोटोसेशन   

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तानच्या संघात शनिवारी (१४ ऑक्टोबर) विश्वचषक सामन्यासाठी महामुकाबला होत आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना पाहण्यासाठी बड्या व्यक्तीसह सेलिब्रिटीही अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. (IND vs PAK)

भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांच्या वेळी विराट कोहलीची पत्नी अनुष्का स्टेडियममध्ये उपस्थित असल्याचे आपणाला पाहायला मिळाली आहे. अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि दिनेश कार्तिकसोबत दिसून आली होती. कार्तिकने एकत्र एक फोटो शेअर केला आहे.

IND vs PAK : अनुष्का विराटला सपोर्ट करणार

आज भारत-पाकिस्तान सामना आहे आणि हा सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अशा परिस्थितीत अनुष्का पती विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी आली आहे. अनुष्का आपल्या पतीला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढे असते, हे पाहून चाहते आनंदी आहेत.

अनुष्का गर्भवती असल्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अनुष्का वर्ल्डकपमधील मॅच बघायला जाणार नाही. कारण ती गर्भवती आहे, अशीही चर्चा सुरू झाली होती. याशिवाय, असेही बोलले जात होते की, संपूर्ण देश या मॅचशी खूप भावनिकरित्या जोडला जाईल. आणि अशा परिस्थितीत अभिनेत्रीला कोणत्याही कारणास्तव कोणत्याही नकारात्मकतेचा सामना करावा लागू नये, अशी त्यांची इच्छा आहे.

दरम्यान, प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो परफॉर्म करणार आहे. अरिजित वर्षभरात दुसऱ्यांदा या स्टेडियममध्ये परफॉर्म करणार आहे. याआधी तो आयपीएल २०२३ च्या ओपनिंग मॅचपूर्वी दिसला होता.

 

हेही वाचा 

Back to top button