Nagar Crime News : ग्रामसेवकास मारहाण करणा-यास ३ महीने सश्रम कारावास | पुढारी

Nagar Crime News : ग्रामसेवकास मारहाण करणा-यास ३ महीने सश्रम कारावास

पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यतील करंडी गावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह कर्मचा ऱ्यास मारहाण करणाऱ्यास अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी ३ महिने सक्षम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अकोले तालुक्यातील करंडी या गावात रोजगार हमी योजनेची शिवार फेरी सर्वे करण्याचे काम करण्यासाठी जायचे होते. त्याचवेळी गावातील दत्तात्रय विठठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि आत्ताच्या आत्ता मला सर्व माहिती हवी आहे, असे ग्रामसेवक सोमनाथ येडे यांना म्हणाला. मात्र, आम्ही सर्वे करून आल्या नंतर तुम्हाला हवी ती माहिती देतो असे समजावून सांगून देखील गोंदके याने ऐकले नाही.

ग्रामसेवक येडे हे बाहेर जाऊ नये म्हणून गोंदके याने ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा लावून घेत येडे यांस ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडून घातले, आणि तब्बल २तासानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा उघडला. येडे हे ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर जावू लागले असता गोंदके यांने येडे यांना लाथ मारून खाली पाडत मारहाण केली. याबाबत सोमनाथ येडे या ग्रामसेवकांनी अकोले पोलिसात २ सप्टेंबरला २०२१ दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल गोंदके यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल करण्यात येऊन विठ्ठल गोंदके यास अटक करण्यात आली होती.

संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांचे समोर तब्बल दोन वर्षानंतर सुनावणी झाली.या खटल्यामध्ये सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी साक्षीदार तपासुन प्रबळ युक्तीवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश मनाठकर यांनी दत्तात्रय विठ्ठल गोंदके याचे विरुद्ध ३ महिन्याचा सश्रम कारावास व २०,हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली पो हे कॉ प्रविण डावरे, मपोकों स्वाती नाईकवाडी, मपोका दिपाली दवंगे, मपोका नयना पंडित, महिला पोलीस प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

Back to top button