Asian Games 2023 : महिला कबड्डीमध्ये भारताला सुवर्ण; पदकांचे शतक केले पूर्ण | पुढारी

Asian Games 2023 : महिला कबड्डीमध्ये भारताला सुवर्ण; पदकांचे शतक केले पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा 2023 मधील भारताचे हे 25 वे सुवर्ण आणि एकूण 100 वे पदक आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच 100 पदके जिंकली आहेत. यावेळी भारतीय खेळाडूंनी 100 डावांचा नारा प्रत्यक्षात उतरवला आहे.

संबंधित बातम्या : 

आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज 14 वा दिवस आहे. गेल्या 13 दिवसांत भारताने एकूण 95 पदके जिंकली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15, नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ, 11व्या दिवशी 12, 12व्या दिवशी आणखी पाच, 13व्या दिवशी नऊ पदके जिंकली. आज भारताची पदकतालिका 100 पार होत आहे.

भारताचे 100 वे पदक

महिला कबड्डी संघाने भारतासाठी 100 वे पदक जिंकले आहे. भारताने यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदके जिंकलेली नाहीत. 72 वर्षांत प्रथमच असे घडले आहे. क्रीडा इतिहासात यापूर्वी कधीही भारताने 100 पदके जिंकली नव्हती. यावेळी भारताने शंभरी पार करण्याचा नारा दिला होता.

हेही वाचा : 

Back to top button