Asian Games 1500 meter Running : भारताचा ‘ट्रीपल’ धमाका! दोन रौप्य; एक कांस्यपदक जिंकले | पुढारी

Asian Games 1500 meter Running : भारताचा ‘ट्रीपल’ धमाका! दोन रौप्य; एक कांस्यपदक जिंकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 1500 Meter : भारताच्या पुरुष आणि महिला धावपटूंनी रविवारी धमाकेदार कामगिरी नोंदवली. 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिला महिला धावपटू हरमिलन कौर बेन्स हिने रौप्य जिंकले. बहरीनच्या विनफ्रेड मुटाइल यावीने सुवर्णपदकावर कब्जा केला.

त्यानंतर काही वेळातच पुरुषांच्या स्पर्धेत अजय कुमारने (3:38.94) रौप्यपदक जिंकले, तर 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जिन्सन जॉन्सनने कांस्यपदक (3:39.74) नावावर केले. कतारच्या मोहम्मद अल गरनीने सुवर्णपदक जिंकले.

याचबरोबर भारताच्या एकूण पदकांची संख्या 48 पर्यंत पोहचली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज आठवा दिवस आहे. भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ आणि सातव्या दिवशी पाच पदके मिळाली. आज भारत पदकांचे अर्धशतक पूर्ण करू शकतो.

Back to top button