Asian Games 2023 | कुस्तीपटू दीपक पुनियाला रौप्यवर मानावे लागले समाधान; अंतिम सामन्यात इराणच्या हसनकडून पराभूत

Asian Games 2023 | कुस्तीपटू दीपक पुनियाला रौप्यवर मानावे लागले समाधान; अंतिम सामन्यात इराणच्या हसनकडून पराभूत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाचा  पुरुषांच्या फ्रीस्टाइल ८६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.  त्याचा अंतिम फेरीत सामना इराणच्या तीनवेळेचा वर्ल्ड चॅम्पियन हसन यझदानी याच्याशी झाला. हसन यझदानीने दीपकचा सामन्यात १०-० असा एकतर्फी पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली. (Asian Games 2023)

आशियाई स्पर्धेतील दीपकचा प्रवास

सेमीफायनलमध्ये त्याने उझबेकिस्तानचा ग्रॅपलर शापिएव्ह याचा ४-३ असा पराभव केला होता. तर दीपकने उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या रंडा रियानडेस्ता याच्यावर ११-० ने मात केली होती. (Asian Games 2023)

भारताने कुस्तीत याआधी ५ पदक जिंकली आहेत. महिलांच्या फ्रीस्टाईल ६२ किलो वजनी गटात भारताच्या सोनम मलिकने चीनच्या जिया लाँग हिला ७-५ असे हरवत कांस्यपदक जिंकले. तर भारताच्या किरण बिश्नोई हिने ७६ किलो वजना गटात मंगोलियाचा अरिंजर्गल गणबात हिला हरवत कांस्यपदक मिळवले. त्यानंतर पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या अमन सेहरावतने चीनच्या लिऊ मिंघू याला ११-० ने हरवत कांस्य जिंकले होते.

महिलांच्या ७६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत किरण बिश्नोईला कझाकस्तानच्या झामिला बाकबरगेनोव्हाकडून २-४ ने पराभव पत्करावा लागला होता. पण तिने कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारली होती.
महिला कुस्तीपटू अंतीम पंघालने महिलांच्या ५३ किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्यपदक जिंकले. तिने कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या बॅट-ओचिर बोलोर्तुया हिला आस्मान दाखवले.

बजरंग पुनियाला उपांत्य फेरीत इराणच्या रहमान अमौजदखलिली याने १-८ गुणांनी हरवले होते. तर कांस्यपदकाच्या लढतीत बजरंगला जपानी कुस्तीपटू कैकी यामागुची याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news