Asian Games 2023 : नेमबाजीत ऐश्‍वर्य तोमरची कांस्यपदकावर माेहर 

Asian Games 2023
Asian Games 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमरचे १० मीटर एअर रायफल प्रकारात आज (दि.२५) कांस्यपदक पटकावले. ऐश्‍वर्यने भारताच्‍या रुद्रांकेश पाटील याचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. दरम्‍यान, (दि.२५)  ऐश्‍वर्य प्रतापसिंग तोमर, रुद्रांश पाटील आणि दिव्यांश सिंग या तिघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकत १० मीटर एअर रायफलमध्ये इतिहास रचला आहे. १८९३.७ च्या एकूण गुणासंह हा विश्वविक्रम केला. यंदाच्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक  आहे. (Asian Games 2023)

संबधित बातम्या

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक

चीनमधील हांगझोऊ येथे १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धा  २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होत आहेत. या कालावधीत ४० खेळांमध्ये एकूण ४८२ स्पर्धा होत आहेत. ज्यात १०,००० हून अधिक ४५ देशांतील खेळाडू सहभागी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकत १० मीटर एअर रायफलमध्ये इतिहास रचला आहे. १८९३.७ च्या एकूण गुणासंह हा विश्वविक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. भारताच्या रुद्रांकेश पाटील, दिव्यांश सिंग आणि ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर या तिघांनी हे यश मिळवले आहे. कोरिया प्रजासत्ताक १८९०.१ गणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि चीन १८८२.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news