क्रिकेटच्‍या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नंबर वन! | पुढारी

क्रिकेटच्‍या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नंबर वन!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताने पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटस् राखून पराभव करत आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. भारत हा आता कसोटी आणि टी-20 पाठोपाठ वन डेमध्ये देखील नंबर वन ठरला आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशियामधील पहिला संघ ठरला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला खाली खेचत वन डे टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

भारतीय संघाने 42 सामन्यांत 4864 पॉईंटस् अन् 116 रेटिंग पॉईंटस् मिळवत अव्वल स्थान गाठले. भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील ही अव्वल स्थानाची रस्सीखेच भारताने अवघ्या 1 गुणाने सध्या तरी जिंकली आहे. पाकिस्तानचे 29 सामन्यांत 3231 पॉईंटस् आणि 115 रेटिंग पॉईंटस् आहेत. ते सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

भारताने कसोटी आणि टी-20 मध्ये देखील टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेबाबत बोलायचे झाले तर भारताने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना हा 24 सप्टेंबरला इंदूर येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना हा 27 सप्टेंबरला राजकोट येथे होणार आहे.

संबंधित बातम्या :

विश्वविजेत्याला मिळणार 33.18 कोटी

भारतात होणार्‍या वन डे वर्ल्डकप स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार्‍या या महास्पर्धेत एकूण 10 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 82 कोटी 95 लाख 82,000 रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. विजेत्या संघाला यापैकी 4 मिलियन म्हणजेच जवळपास 33.18 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उपविजेत्याला 2 मिलियन म्हणजेच 16 कोटी दिले जातील.

सर्व 10 संघ ग्रुप स्टेजमध्ये राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांशी एकदा खेळतील, पॉईंट टेबलमधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ग्रुप स्टेज फेरी जिंकण्यासाठी देखील बक्षीस रक्कम आहे. प्रत्येक विजयासाठी संघांना 40,000 अमेरिकन डॉलर्स मिळतात. गट स्टेजच्या शेवटी, बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघांना प्रत्येकी 100,000 अमेरिकन डॉलर्स मिळेल.

हेही वाचा : 

Back to top button