Rahul Dravid Press Conference : सूर्याला अल्टिमेटम? वनडे मालिकेपूर्वी द्रविड गुरुजींनी घेतली शिकवणी, म्हणाले… | पुढारी

Rahul Dravid Press Conference : सूर्याला अल्टिमेटम? वनडे मालिकेपूर्वी द्रविड गुरुजींनी घेतली शिकवणी, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid Press Conference : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला सामना मोहाली येथे दुपारी दीड वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मालिका आणि खेळाडूंशी संबंधित अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. वनडेत फ्लॉप ठरणाऱ्या सूर्यकुमार यादवची यावेळी त्यांनी पाठराखण केली.

‘आमचा सूर्याला पूर्ण पाठिंबा’ (Rahul Dravid Press Conference)

द्रविड म्हणाले, “आम्ही सूर्यकुमार यादव यांना पूर्ण पाठिंबा देतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो आपला फॉर्म बदलण्यात यशस्वी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याला पहिल्या दोन वनडेत संधी मिळेल. आपल्याला 27 सप्टेंबरची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही या आधारावर एकदिवसीय संघ निवडलेला नाही. विश्वचषक संघात सूर्या नक्कीच आहे. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देतो कारण त्याच्यातील गुणवत्ता आणि क्षमता आपण पाहिली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो प्रभाव पाडतो. तो गेमचेंजरची भूमिका बजावू शकतो, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.’

‘..म्हणून रोहित, विराटला विश्रांती दिली’

‘विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय परस्पर चर्चा आणि सल्लामसलतीनंतर घेण्यात आला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी वरिष्ठ खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने राहावे अशी संघाची इच्छा आहे,’ असाही द्रविड यांनी यावेळी खुलासा केला. (Rahul Dravid Press Conference)

‘प्लेईंग इलेव्हन बाबत नो कमेंट’

द्रविड पुढे म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हन कशी असेल याबाबत मी आताच काही सांगणार नाही. पण ईशान किशन किंवा इतर कोणत्याही फलंदाजाला आम्ही एकाच क्रमांकावर खेळवू. हे थोडे कठीण आहे. मात्र असे असतानाही आम्ही विश्वचषकानुसार फलंदाजीची फळी तयार करू.’

‘अश्विन नेहमीच योजनेचा भाग होता’

अश्विनचे ​​तब्बल दीड वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन झाले आहे. अश्विनचा अनुभव आमच्यासाठी चांगला असल्याचे द्रविड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘अश्विन गोलंदाजीस 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगले योगदान देऊ शकतो. दुखापतीची समस्या असल्यास तो नेहमी संघाच्या योजनांचा भाग असायचा. त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू संघात असणे खूप महत्त्वाचे आहे.’

अश्विन 7 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे खेळणार

अश्विन 21 महिन्यांनंतर भारताकडून एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो 7 वर्षांनंतर एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अश्विनने या संघाविरुद्ध 15 जानेवारी 2016 रोजी ब्रिस्बेन येथे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. अश्विनचे भारतासाठी आतापर्यंत 113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 151 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 15 सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने एकूण 16 विकेट घेतल्या आहेत. 51 धावांत 2 बळी ही अश्विनची कांगारूंविरुद्धची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Back to top button