Virat-Rohit 5000 Runs : 3 धावांवर बाद होऊनही कोहलीचा रोहितच्या साथीने ‘विराट’ विक्रम!

Virat-Rohit 5000 Runs : 3 धावांवर बाद होऊनही कोहलीचा रोहितच्या साथीने ‘विराट’ विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat-Rohit 5000 Runs : आशिया कपच्या सुपर 4 फेरीतील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली, परंतु या सामन्यात शुभमन गिल काही विशेष करू शकला नाही आणि 19 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने केवळ 3 धावांची इनिंग खेळली. या सामन्यात कोहलीने निराश केले, परंतु त्याच्या छोट्या खेळीदरम्यान त्याने रोहितसह वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचला.

सर्वात जलद 5000 धावा करणारी जोडी (Virat-Rohit 5000 Runs)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकत्र खेळताना 5000 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर नव्या विश्वविक्रमाचीही नोंद झाली आहे. एक जोडी म्हणून कोहली आणि रोहित यांनी एकदिवसीय सामन्यात केवळ 86 डावात 5000 धावा पूर्ण केल्या आणि जोडी म्हणून सर्वात वेगवान धावांचा हा आकडा गाठला. या दोघांनी वनडे विंडिजच्या गार्डन ग्रीनिज आणि डेसमन्स हेन्स यांचा विक्रम मोडीत कढला. कॅरेबियन जोडीने वनडे क्रिकेटमध्ये 97 डावांत 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. आता रोहित-विराट ही भारतीय जोडी ग्रीनिज आणि हेन्स या विंडिज जोडीच्या पुढे गेली आहे.

वनडेमध्ये जलद 5000 धावा करणा-या जोड्या (Virat-Rohit 5000 Runs)

86 डाव : रोहित शर्मा-विराट कोहली (भारत)
97 डाव : गार्डन ग्रीनिज-डेसमन्स हेन्स (वेस्ट इंडिज )
104 डाव : मॅथ्यू हेडन-ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
104 डाव – कुमार संगकारा-दिलशान तिलकरत्ने (श्रीलंका)
112 डाव – रोहित शर्मा-शिखर धवन (भारत)
116 डाव – सचिन तेंडुलकर-सौरभ गांगुली

विराट-रोहित : 5000 धावांची भागीदारी करणारी 8वी जोडी

वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांची भागीदारी करणारी विराट-रोहित ही 8वी जोडी ठरली आहे. तर भारताची तिसरी जोडी ठरली आहे. वनडेमध्ये जोडी म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी मिळून 8227 धावा वसूल केल्या आहेत.

ODI मध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी केलेल्या जोड्या

8227 धावा : सचिन तेंडुलकर-सौरभ गांगुली (भारत)
5992 धावा : महेला जयवर्धने-कुमार संगकारा (श्रीलंका)
5475 धावा : दिलशान तिलकरत्ने-कुमार संगकारा (श्रीलंका)
5462 धावा : मरवान अटापट्टू-सनथ जयसूर्या (श्रीलंका)
5409 धावा : ॲडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
5206 धावा : ग्रीनिज-हेन्स (वेस्ट इंडिज)
5193 धावा : रोहित शर्मा-शिखर धवन (भारत)
5000 धावा : रोहित शर्मा-विराट कोहली (भारत)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news