Rohit Sharma 10000 Runs : रोहित शर्माचा धमाका! सचिन तेंडुलकरचा वनडेतील ‘हा’ विक्रम मोडला | पुढारी

Rohit Sharma 10000 Runs : रोहित शर्माचा धमाका! सचिन तेंडुलकरचा वनडेतील ‘हा’ विक्रम मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma 10000 Runs : आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. हिटमॅनने एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारा रोहित जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहितला त्याच्या 241व्या डावात 10 हजार वनडे धावा पूर्ण करण्यात यश आले आहे. वनडेमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 205 डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय सचिनने 259 डावात वनडेमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय रोहित शर्मा भारताकडून वनडेमध्ये 10 हजार धावा करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

ODI मध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणारे खेळाडू

विराट कोहली : 205 डाव
रोहित शर्मा : 241 डाव
सचिन तेंडुलकर : 259 डाव
सौरव गांगुली : 263 डाव
रिकी पाँटिंग : 266 डाव
जॅक कॅलिस : 272 डाव
धोनी : 273 डाव
ब्रायन लारा : 278 डाव

ODI मध्ये 10 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज

सचिन तेंडुलकर – धावा 18,426 : सरासरी 44.83 : डाव 452 : शतके 49 : अर्धशतके 96
विराट कोहली – धावा 13,024 : सरासरी 57.62 : डाव 267 : शतके 47 : अर्धशतके 65
सौरव गांगुली – धावा 11,221 : सरासरी 40.95 : डाव 297 : शतके 22 : अर्धशतके 71
राहुल द्रविड – धावा 10,768 : सरासरी 39.15 : डाव 314 : शतके 12 : अर्धशतके 82
महेंद्रसिंग धोनी – धावा 10,599 : सरासरी 50.23 : डाव 294 : शतके 9 : अर्धशतके 73
रोहित शर्मा – धावा 10,000* : सरासरी 48.91 : डाव 240 : शतके 30 : अर्धशतके 50

रोहितने 22 धावा करताच इतिहास रचला

श्रीलंकेविरुद्धच्या 50व्या सामन्यादरम्यान रोहित शर्माने एका खास क्लबमध्ये प्रवेश केला. त्याने 22 धावा करताच इतिहास रचला गेला. आशिया कपमध्ये याआधीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 122 धावा केल्या आणि वनडे क्रिकेटमधील 13 हजार धावा पूर्ण केल्या. आता रोहित शर्माने 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट अर्धशतक झळकावले होते.

Back to top button