Asia Cup 2023 : अश्विनचे नाव घेताच सुनील गावसकर भडकले; म्हणाले, ‘..तर मॅच पाहू नका’ | पुढारी

Asia Cup 2023 : अश्विनचे नाव घेताच सुनील गावसकर भडकले; म्हणाले, '..तर मॅच पाहू नका'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. 17 जणांच्या संघात अशी काही नावे आहेत जी आश्चर्यचकित करणारी आहेत. तर काही अशी नावे आहेत ज्यांचा समावेश न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. युझवेंद्र चहलला, आर. अश्विन या फिरकीपटूंना डावलल्याने चाहत्यासह अनेक माजी खेळाडू नाराज अहेत. एका स्पोर्ट्स शोमध्ये सुनील गावसकर यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याने ऐकायलाच हवे. गावसकर म्हणाले की, ‘कोणत्याही स्पर्धेसाठी जेव्हा संघाची घोषणा होते त्यानंतर काही वेळातच नव्या वादाला सुरुवात होते. हे नित्याचे झाले आहे. वादाचे एकच कारण असते ते म्हणजे, एका खेळाडूला घेतले आणि दुस-या वगळले’

संघ निवडीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की, दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत. संघात फक्त 17 खेळाडू ठेवता येतील. अशा स्थितीत कॉम्बिनेशन पाहता काही खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला. यामध्ये युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांना आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. यामुळे चाहते निराश झाले आहेत. (Asia Cup 2023)

भारताच्या 17 सदस्यीय संघात तीन फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर अश्विन आणि चहल यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असा वाद सोशल मीडियावर सुरू आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी हा वाद निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. संघाबाबत कोणताही वाद होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. (Asia Cup 2023)

संघ निवडीदरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले होते की, संघाचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत. संघात फक्त १७ खेळाडूंचा समावेश होणार आहे. अशा परिस्थितीत कॉम्बिनेशन पाहता काही खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. संघ निवडीबाबत चर्चा करण्यासाठी गावसकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. या दरम्यान, एका चाहत्याने अश्विनच्या निवडीबद्दल प्रश्न विचारल्यावर ते संतापले.

‘वाद निर्माण करणे थांबवा’

सुनील गावसकर म्हणाले, “होय, असे काही खेळाडू आहेत जे स्वतःला भाग्यवान समजतील, पण संघाची निवड झाली आहे. त्यामुळे अश्विनबद्दल बोलू नका. वाद निर्माण करणे थांबवा. आता हा आमचा संघ आहे. तुम्हाला ते आवडत नसेल तर मॅच पाहू नका. पण, त्याला सिलेक्ट व्हायला हवं होतं किंवा दुसऱ्याला असायला हवं होतं असं म्हणणं थांबवा, ही चुकीची मानसिकता आहे. (Asia Cup 2023)

कोणावरही अन्याय झालेला नाही : गावसकर

सॅमसन, चहल, अश्विन किंवा सुंदर यांचे नाव न घेता गावसकर म्हणाले की, त्यांच्याशी चुकीचे वागले गेले असा कोणीही दावा करू शकत नाही. ते म्हणाले, “मला वाटत नाही की कोणताही खेळाडू आपल्यावर अन्याय झाला आहे, असा दावा करू शकेल. आशिया चषक स्पर्धेत १७ सदस्यीय संघात अनुभवी आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
गावसकर यांनीही राहुलच्या निवडीच्या निर्णयाचे समर्थन केले. की २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकाच्या सलामीसाठी कदाचित उपलब्ध नसेल.

राहुलबाबत गावसकर म्हणाले की, त्याची दुखापत कशी आहे हे पाहावे लागेल. आशिया चषक जिंकणे महत्त्वाचे आहे पण लक्ष्य विश्वचषक आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला के.एल राहुलला वर्ल्डकप संघात हवा असेल तर मला वाटते की त्यांनी त्याला आशिया चषकासाठी निवडले आहे. हे थोडे अडचणीत असतानाही. भारताचा विचार केला तर स्पर्धेसाठी अजून ११ दिवस बाकी आहेत. याआधी के.एल. राहुलने संघासाठी जे काही केले आहे त्यानंतर त्याला संधी देणे योग्य ठरेल.

‘वर्ल्ड कप जिंकण्याचे ध्येय’

गावसकर पुढे म्हणाले, “आशिया चषकासाठी निवडलेला संघ चांगला आहे. विश्वचषकासाठी या संघातून १५ खेळाडूंची निवड करायला हवी. तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आशिया कप एक मोठी स्पर्धा आहे पण विश्वचषक जिंकणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आशिया चषक जिंकून त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मोठे स्वप्न पहावे लागेल. जर टीम इंडियाने आशिया चषक जिंकला, तर खूप छान पण विश्वचषक जिंकण्याचे ध्येय आहे.

हेही वाचा;

Back to top button