Harry Kane Transfer | इंग्लंडचा कॅप्टन हॅरी केन बायर्न म्युनिकसोबत करारबद्ध, दरवर्षी मिळणार २२७ कोटी | पुढारी

Harry Kane Transfer | इंग्लंडचा कॅप्टन हॅरी केन बायर्न म्युनिकसोबत करारबद्ध, दरवर्षी मिळणार २२७ कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिकशी करार केला आहे. तो इंग्लिश क्लब टॉटेनहॅम हॉटस्परकडून तब्बल १९ वर्ष खेळला. हॅरी केनने २००९ मध्ये टॉटनहॅमकडून खेळण्यास सुरुवात होती. या १९ वर्षांमध्ये त्याने क्लबसाठी, त्याने ४३० सामने खेळले. यामध्ये त्याने २८० गोल केले आणि ६४ असिस्ट केले आहेत.  (Harry Kane Transfer)

हॅरी केनसाठी बायर्नने मोजली इतकी किंमत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायर्नने हॅरीला २५ मिलियन युरो म्हणजेच दरवर्षी २२७ कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच चार वर्षांसाठी बायर्नने हॅरी केनसाठी ९०९ कोटी रुपये मोजले आहेत. यंदाच्या हंगामातील ही सर्वात मोठी रक्कम आहे. रॉबर्ट लेवांडोस्कीच्या जाण्यानंतर बायर्न म्युनिकने हॅरीसोबत करार करत आपल्या परिपूर्ण स्ट्रायकरचा शोध संपवला आहे.  बायर्नने २०१९-२० हंगामापासून चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकलेले नाही. हॅरी संघाचे नेतृत्व UEFA चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदासाठी करेल अशी अपेक्षा आहे. (Harry Kane Transfer)

हॅरीची भावनिक पोस्ट

मी याला अलविदा म्हणू शकत नाही, कारण मला माहित नाही की भविष्य कुठे घेवून जाईल. भविष्यात गोष्टी कशा होतील मला माहित नाही. परंतु टॉटनहॅमच्या चाहत्यांचे आणि टीम स्टाफचे आभार. मी तुम्हाला लवकरच पुन्हा भेटेन.

यासह बायर्न म्युनिचने हॅरीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी हॅरी शुक्रवारी (दि.११) म्युनिकला पोहोचला. बायर्न म्युनिक आणि लीपझिग यांच्यातील जर्मन सुपर कप सामन्यादरम्यान तो खेळणार आहे.

हेही वाचा;

Back to top button