FIFA Women’s World Cup | स्वीडन आणि स्पेनची वुमन्स वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक | पुढारी

FIFA Women's World Cup | स्वीडन आणि स्पेनची वुमन्स वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा वुमन्स वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वीडनने जपानचा पराभव केला. ऑकलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीडनने जपानचा २-१ अशा गोल फरकाने पराभव करत पाचव्यांदा वुमन्स फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत स्पेनने उपांत्य फेरीत प्रवेश केला. (FIFA Women’s World Cup)

जपानने २०११ साली झालेल्या वुमन्स वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनने गतविजेत्या नेदरलँड्सचा २-१ अशा गोल फरकाने पराभव करत प्रथमच वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना वेलिंग्टन येथे खेळवण्यात आला. (FIFA Women’s World Cup )

स्वीडनकडून जपानचा २-१ ने पराभव

सामन्याच्या सुरूवातीपासून स्वीडनच्या खेळाडूंनी आक्रमक खेळीचा अवलंब करत जपानवर खोलवर चढाया केल्या. याचा फायदा स्वीडनला सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला झाला. स्वीडनची बचावपटू अमांडा इलेस्टेडने जपानची बचावफळी भेदत गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर जपानच्या खेळाडूंनी स्वीडनची आघाडी कमी करण्यासाठी अनेक चढाया केल्या. परंतु स्वीडनच्या बचावफळीने त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये जपानच्या खेळाडूने स्वीडनच्या खेळाडूला आक्षेपार्हरित्या आडवल्यामुळे सामन्याच्या ५१व्या मिनिटाला पेनल्टी किक देण्याच्या निर्णय घेतला. या संधीचे सोने करत फिलिपा एन्गेलडाहलने संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. स्वीडनची आघाडी करण्यासाठी जपानच्या खेळाडूंनी अनेक प्रयत्न केले. परंतु स्वीडनची गोलकीपर जेसिरा मुसोविकनेही आणि बचावपटूंनी केलेल्या शानदार खेळीमुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही.

सामन्याच्या ८७ व्या मिनिटाला जपानच्या खेळाडूला स्वीडनच्या खेळाडूने आक्षेपार्हरित्या अडवल्यामुळे रेफ्रींनी पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेत जपानच्या होनोका हयाशीने गोल नोंदवत २-१ ने स्वीडनची आघाडी कमी केली. सामन्याच्या निर्धारित वेळेत २-१ अशी आघाडी कायम ठेवत स्वीडनने जपानचा पराभव करत उपांत्य सामन्यात धडक मारली.

एक्ट्रा टाईममध्ये सलमाचा गोलं अण् स्पेन उपांत्य फेरीत दाखल

एक्ट्रा टाईमपर्यंत चाललेल्या सामन्यात स्पेनने नेदरलॅन्ड्सवर २-१ ने पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी शॉर्ट पासिंगद्वारे सामन्यावर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करत गोल करण्याच्या अनेक निर्माण केल्या. परंतु फिनिशिंगच्या अभावे दोन्ही संघाना पहिल्या हाफमध्ये गोल करण्यात यश आले नाही.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आपआपल्या रणरणितीमध्ये बदल करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. परंतु, दोन्ही संघाच्या बचावफळीने केलेल्या उत्कृष्ट खेळी त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला नेदरलॅन्ड्सची बचावपटू स्टेफनी व्हॅन डर ग्राटने डेंजर झोनमध्ये हॅन्ड केल्यामुळे रेफ्रींनी स्पेनला पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेत मॅरियन कॅल्डेन्टीने संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

स्पेनची आघाडी कमी करण्यासाठी नेदरलॅन्ड्सने वेगवान चढाया रचत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, स्पेनच्या भक्कम बचावापुढे नेदरलॅन्ड्स गोल करता आला नाही. यानंतर नेदरलॅन्ड्सच्या स्टेफनी व्हॅन डर ग्रॅग्ट इंन्जुरी टाईममध्ये गोल करत संघाला स्पेनशी १-१ अशी बरोबरी साधली.

निर्धारित ९० मिनिटांमध्ये गोलस्कोर १-१ असा बरोबरीत असल्यामुळे रेफ्रींनी सामन्याच्या निकाल एक्स्ट्रा टाइममध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. एक्स्ट्रा टाइमच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी चढाया केल्या यात त्यांना यश आले नाही. एक्स्ट्रा टाइमच्या दुसऱ्या हाफमध्ये स्पेनची १९ वर्षीय युवा खेळाडू सलमा पार्लुएलो शानदार शॉट मारत गोलची नोंद केली. हा गोल तिने सामन्याच्या १११ मिनिटाला नोंदवत स्पेनला सामन्यात आघाडी मिळवून देत सामन्यात विजय मिळवला.

हेही वाचा;

Back to top button